Connect with us

टॉप 6 मायलेज देणाऱ्या पेट्रोल कार

Money

टॉप 6 मायलेज देणाऱ्या पेट्रोल कार

नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर खालील गाड्यांचा विचार नक्की करा. या 6 उत्तम मायलेज देणाऱ्या पेट्रोल गाड्या आहेत. सर्वसाधारण पणे पेट्रोल कार ही डीझेल कार पेक्षा स्वस्त असते त्यामुळे लोकांचा पेट्रोल कार खरेदी करण्याकडे कल असतो.

रेनो क्विड

या कारने बाजारामध्ये येताच धुमाकूळ घातला आहे. कमी किंमतीच्या या कारचा प्रीमियम लूक आणि सर्वाधिक इंटेरिअर, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि चांगले फिचर्स आहेत. या कारची किंमतीची सुरूवात 2.67 लाखा पासून पुढे आहे. रेनोची ही कार 25.17 किमी/लीटर मायलेज देते.

डॅटसन रेडिगो

रेडिगोला सर्वात मोठी कार तुम्ही मानू शकत नाही. मात्र 2.81 लाख रुपयातील ही कार अफोर्ड करण अतिशय सोप आहे. डॅटसन रेडिगो 0.8 लीटर इंजिनसोबत ही कार 54 एचपीची पावर जनरेट करतात. रेनो क्विडसोबत ही कार उत्तम मायलेज देणारी ही कार आहे. 25.17 किमी/लीटर मायलेज देते.

मारूती अल्टो 800

मारूतीची सर्वात छोटी आणि लोकप्रिय कार अल्टो 800 भारतात अजूनही अतिशय लोकप्रिय आहे. ही कार आजही लोकप्रिय आहे याच महत्वाच कारण म्हणजे मायलेज आणि कमी किंमत. या कारची इंजिन 796 सीसी असून 48 एचपीची टार्क जनेरेट करतात. ही कार आतापर्यंत सर्वाधिक मायलेज देणारी कार असून ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. याचा मायलेज 24.7 किमी/लीटर आहे.

मारूती अल्टो के 10

अल्टोनंतर मारूती कंपनीची अल्टो के 10 चा दुसरा क्रमांक येतो. या कारचं इंजिन अल्टो 800 कारपेक्षा अधिक ताकदवान आहे. 1.0 लीटरची ही कार 68 एचपी पॉवर जेनरेट करते. या कारची किंमत 3.30 लाख रुपये आहे. जी उत्तम मायलेजच्या समोर अतिशय कमी आहे. मारूतीच्या या कारचं मायलेज 24.07 किमी/लीटर आहे. यामुळे ही कार चौथ्या क्रमांकावर आहे.

टाटा टियागो

टाटाच्या या कारचे मायलेज सर्वाधिक असून ही कार पाचव्या क्रमाकांवर आहे. टियागो ही कार अतिशय स्टायलिश कार आहे. कारचे हे फीचर्स हॅचबॅक कारपेक्षा अधिक आहेत. या कारमध्ये 85 एचपी, 1.2 लीटर इंजिन दिलं आहे. कारच्या सेगमेंटमध्ये हे सर्वाधिक कमी आहे. कारची मायलेजबाबत बोलायचं झालं तर 23.84 किमी/लीटर मायलेजमध्ये ही सर्वात शानदार कार आहे.

मारूती सेलेरियो

मारूतीची कार सेलेरियो ही हॅचबॅक कारमध्ये वेगळी कार आहे. या कारची किंमत 4 लाख रुपये आहे. या कारच इंजिन 68 एचपी, 1.0 लीटर तीन सिलेंडरचं आहे. जे अल्टो के 10 सारखे आहे. कारच्या मायलेजमध्ये 23.1 किमी/लीटर आहे.

जास्त मायलेज देणाऱ्या कारची हि लिस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर पोस्ट लाईक आणि शेयर करण्यास विसरू नका ज्यामुळे तुमच्या मित्रांना देखील नवीन कार खरेदी करतांना मदत होईल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top