People

कमी शिक्षण झाले आहे निराश नका होऊ, ही 5 कामे करून तुम्ही कमवू शकता भरपूर पैसा

शिक्षणाचे जीवनात फार महत्व आहे. एक चांगली नोकरी मिळवण्यासाठी शिक्षणाची गरज असते. पण त्यांचे काय जे अशिक्षित आहेत किंवा कमी शिकलेले आहे. आम्ही सांगत असलेली ही 5 कामे करून कमी शिकलेले व्यक्ती ही चांगले पैसे कमवू शकतात. ही कामे करण्यासाठी शिक्षणाची विशेष गरज नाही पण हो अंगात कला असणे गरजेचे आहे यासाठी तुम्ही पुढील कोर्सेस करून ती कला अवगत करू शकता. ज्यामुळे तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.

फैशन डिजाइनिंग

ज्यांचे शिक्षण 12 वी पर्यंत ज्यांचे शिक्षण झाले आहे ते फैशन डिजाइनिंगचा कोर्स करू शकतात. या मध्ये शोर्ट टर्म कोर्स पण उपलब्ध असतात ज्यामध्ये 6 महिने ते 1 वर्षा पर्यंतचे पर्याय असतात. यापैकी एखादा कोर्स निवडून तुम्ही सुरुवात करू शकता. 10 वी पास झालेले लोक अपैरल पैटर्न मेकिंग कोर्स करू शकतात.

हेयर स्टाइलिंग

फक्त फिल्म स्टार नाही तर सामान्य लोकांना पण हेयर स्टाइलिंगची आवड असते. हे एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये करियर करण्याची चांगली संधी आहे. कमी शिक्षण असले तरी या क्षेत्रात तुम्ही चांगली कमाई करू शकतो.

सौंदर्य क्षेत्र

हे एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये मुलींच्या सोबत मुलांनाही पुढे जाण्याची संधी मिळत आहे. ज्यालोकांनी आपली 10 वी किंवा 12 वी परीक्षा पास केली आहे ते ब्युटी कल्चर मधील एखादा कोर्स करून सौंदर्य क्षेत्रात प्रवेश करू शकतात आणि भरपुर कमाई करू शकतात.

रीपेयरिंग

इलेक्ट्रॉनिक गैजेटस रीपेयरिंग करण्याचा कोर्स 8वी आणि 10वी पर्यंत शिकलेले लोक करू शकतात. हा कोर्स केल्यानंतर स्वताचे सर्विस सेंटर सुरु करून चांगले उत्पन्न मिळवू शकता. तुम्ही रेडियो एंड टेलीविज़न कंपोनेंट, रिपेयर ऑफ़ इलेक्ट्रॉनिक्स गैजेट्स, रिपेयरिंग एंड मेंटेनेंस ऑफ़ मोबाइल फ़ोन सारखे कोर्स करू शकता. यांचा कालावधी 2 आठवडे, 6 महिने ते 1 वर्षा पर्यत असतो.

पर्यटन

पर्यटन मुळे हॉस्पिटैलिटी सेक्टर मध्ये रोजगार वाढत आहे. कमी शिक्षण झालेले लोक यामध्ये आपले करियर करू शकतात. यासाठी 3 ते 6 महिन्याचा ट्रेवल एंड टिकटिंग चा कोर्स करून तुम्ही सुरुवात करू शकता. हा कोर्स केल्या नंतर तुम्ही होटल्स, एयरलाइन्स, ट्रेवल एजेंसी, ग्राउंड स्टाफ चे कामे करू शकता.


Show More

Related Articles

Back to top button