Connect with us

शुक्रवार 06 जुलै : आज या 4 राशीवाल्यांचा बनत आहे राजयोग, राजा सारखा जाईल दिवस

Astrology

शुक्रवार 06 जुलै : आज या 4 राशीवाल्यांचा बनत आहे राजयोग, राजा सारखा जाईल दिवस

आज शुक्रवार 06 जुलै चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Friday, July 06, 2018)

आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. अचानक प्रणयाराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. रोमँटिक गाणी, सुगंधी मेणबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मदिरा; तुमच्या जोडीदारासमवेत या सगळ्याचा आस्वाद घेणार आहात.

वृषभ राशी भविष्य (Friday, July 06, 2018)

एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेमसफरीवर जाणार आहात. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या फवा पसरविण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज एक उत्तम संध्याकाळ व्यतित करणार आहात.

मिथुन राशी भविष्य (Friday, July 06, 2018)

तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडेदेखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शिस्तबद्ध पण मुलं नसलेलं घर निर्जीव ठरते. मुलं घराचं औदार्य आणि आनंद देणारी असतात. प्रणयराधना करण्याची भावना जोडिदाराकडून आज अनुभवता येईल. ऑफिसमध्ये व्हिडिओगेम खेळल्यामुळे त्याचे परिमाण तुम्हाला भोगावे लागू शकतात. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल.

कर्क राशी भविष्य (Friday, July 06, 2018)

तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल. त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. शिशिर ऋतुतील पानगळी प्रमाणे आपले प्रेम जीवन असू शकेल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाला, पण नंतर तुम्हाला जाणवेल जे झालं ते चांगल्यासाठीच होतं.

सिंह राशी भविष्य (Friday, July 06, 2018)

दीर्घकालीन आजार-व्याधीकडे दुर्लक्ष करू नका, त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. वयोवृद्धाची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. अर्धवट, अयोग्य कामात स्वत:ला गुंतवू नका, त्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. रम्य सहली समाधानकारक ठरतील. वैवाहिक आयुष्यात बऱ्याच मागण्या पूर्ण कराव्या लागतात, तुम्ही जर त्या पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे सतर्क राहा.

कन्या राशी भविष्य (Friday, July 06, 2018)

तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आपण आपल्या कुटुंबियांची किती काळजी करता हे त्यांना जाणवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संदेश सतत देत राहा. त्यांच्याबरोबर आपला कीमती वेळ घालवल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होईल. प्रेमप्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल.

तुल राशी भविष्य (Friday, July 06, 2018)

आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय, याची जाणीव आज तुम्हाला होईल.

वृश्चिक राशी भविष्य (Friday, July 06, 2018)

आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. अतिभावनाप्रधानता तुमचा दिवस उद्ध्वस्त करेल. विशेषत: आपली प्रिय व्यक्ती दुस-यांशी अतिमित्रत्त्वाने वागताना पाहून तुम्हाला त्रास होईल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुस-यांच्या दडपणाखाली वावरू नका. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील मजा निघून गेली आहे, असे तुम्हाला वाटेल, पण लवकरच सगळं काही ठीक होईल.

धनु राशी भविष्य (Friday, July 06, 2018)

आजवर दबून राहीलेले सुप्त प्रश्न उभे राहील्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. मनाला रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल.

मकर राशी भविष्य (Friday, July 06, 2018)

मोतीबिंदू असणा-या रुग्णांनी प्रदुषित वातावरणात जाणे टाळावे. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. तुमच्या खिडकीत फुले ठेवून तुमच्या प्रिय व्यक्तीला दाखवा. कामाच्या ठिकाणी परिस्थिती काहीशी बिघडलेली असू शकेल. तुमचे शत्रू तुमच्याविरोधात काही कट रचू शकतील. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल.

कुम्भ राशी भविष्य (Friday, July 06, 2018)

अतिखाणे टाळा, तुमच्या वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. मुलीचे आजारपण तुमचा मूड खराब करु शकते. ती तिच्या आजारवर मात करु शकेल असे चैतन्य, प्रेमाने तिच्यामध्ये निर्माण करा. प्रेमामध्ये कोणतेही दुख दूर सारण्याची ताकद आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेला चांगला मित्र आज कदाचित त्रास देऊ शकतो. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी खास खरेदी करेल.

मीन राशी भविष्य (Friday, July 06, 2018)

बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. तुमच्यावर प्रेम करणाºया आणि तुमची काळजी वाटणाºया लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ घालवा. प्रेम आशेचा किरण दाखवेल. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुस-या कोणालाही घेऊ देऊ नका. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला तळहातावरच्या फोडासारखं जपेल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top