astrology

मंगळवार 09 एप्रिल : आज या 5 राशींच्या आयुष्यात होणार चमत्कारिक फायदा, मिळणार मोठा आनंद

आज मंगळवार 09 एप्रिल चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Tuesday, April 09, 2019)

तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. ब-याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटण दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमान्स जागा होणार आहे.

वृषभ राशी भविष्य (Tuesday, April 09, 2019)

सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणा-या हट्टी स्वभावाचा त्याग करा. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील – तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल – निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. रोमान्ससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काही तरी खास योजना आखा, आणि आजची सायंकाळ जास्तीतजास्त रोमॅण्टीक करण्याचा प्रयत्न करा. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल.

मिथुन राशी भविष्य (Tuesday, April 09, 2019)

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल – अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.

कर्क राशी भविष्य (Tuesday, April 09, 2019)

तुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. विवाह हे एक वरदान आहे, आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे.

सिंह राशी भविष्य (Tuesday, April 09, 2019)

आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे, काळजी घ्या. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊद्या, त्यागाची आत्मसर्मपणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा. त्यामुळे आपले कौटुंबिक आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्क सहकार्य तुम्हाला मिळेल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर संशय घेईल. पण दिवसाच्या शेवटी मात्र तो/ती समजून घेईल आणि तुम्हाला मिठीत घेईल.

कन्या राशी भविष्य (Tuesday, April 09, 2019)

प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की, कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसूकपणे सकारात्मक विचार करेल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याची तब्येत तुमच्या तणावाचे कारण ठरू शकते. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील – लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. आजच्याएवढं तुमचं वैवाहिक आयुष्य कधीच रंगीबेरंगी नव्हतं.

तुल राशी भविष्य (Tuesday, April 09, 2019)

तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधामध्ये समारेच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे आणि त्या व्यक्तीला गृहित धरणे यामुळे संबंध बिघडतात हे तुम्हाला समजायला हवे. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅण्टीक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील.

वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, April 09, 2019)

मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गूल व्हाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. कामच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते आज त्या व्यक्तीशी तुमचा सुसंवाद होईल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या टीनएजमध्ये जाल, आणि त्यावेळी जी मजा केली होती, तिची उजळणी करून पुन्हा त्याचा अनुभव घ्याल.

धनु राशी भविष्य (Tuesday, April 09, 2019)

आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल.

मकर राशी भविष्य (Tuesday, April 09, 2019)

तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. नवजात बालकांचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवल. तुम्हाला त्याकडील त्वरित लक्ष द्याावे लागेल. योग्य तो वैद्याकीय सल्ला घ्या, छोटेसे दुर्लक्षदेखील प्रश्न गंभीर करू शकते. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अतिभावूक बोलू नका. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खासगी स्पेस आवश्यक आहे.

कुम्भ राशी भविष्य (Tuesday, April 09, 2019)

तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पु-या करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. विवाहानंतर पापाचं रुपांतर पुजेत होतं आणि आज तुम्ही भरपूर पुजा करणार आहात.

मीन राशी भविष्य (Tuesday, April 09, 2019)

मद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाता. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे नेतृत्वगुण आहेत आणि लोकांच्या गरजा समजून घेण्याची संवेदनशीलता आहे – तुमच्या मनातील ख-या भावना प्रकट करा आणि परिस्थिती तुमच्या बाजूने वळवाल. लोकांची मने जिंकून घ्याल. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close