Connect with us

रविवार 30 सप्टेंबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील उत्तम, तर या 3 राशीसाठी त्रासदायक

Today's Horoscope

रविवार 30 सप्टेंबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील उत्तम, तर या 3 राशीसाठी त्रासदायक

आज रविवार 30 सप्टेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Sunday, September 30, 2018)

आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पु-या करण्याची काळजी घेईल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. प्रवास-करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार, रोमान्सने भरलेले असेल ज्यात फक्त तुम्ही आणि तुमचा जोडीदार असे दोघेच असाल.

वृषभ राशी भविष्य (Sunday, September 30, 2018)

आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर किती प्रेमक करतो/करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. उत्तम अन्न, रोमँटिक क्षण; तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहेत.

मिथुन राशी भविष्य (Sunday, September 30, 2018)

कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका. अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषत: आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. तुमच्या पालकांसोबत तुमचा आनंद वाटा. एकटेपणा आणि उदासीनतेच्या भावनेमुळे दडपणाखाली असलेल्या पालकांना थोडे बरे वाटेल. एकमेकांचे आयुष्य कमी अडचणींचे करू शकला नाहीत तर मग जगण्याला अर्थ काय राहतो. रोमान्ससाठी चांगला दिवस. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं किती महत्त्व आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

कर्क राशी भविष्य (Sunday, September 30, 2018)

तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामांबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. प्रेम प्रकरण थोडेस कठीण असेल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.

सिंह राशी भविष्य (Sunday, September 30, 2018)

आरोग्य चांगले राहील. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे तुम्ही निर्माण कराल. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणा-या लोकांना तुम्ही वचन द्यााल. वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल.

कन्या राशी भविष्य (Sunday, September 30, 2018)

तुमचे मनमोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. तुमचा भाऊ तुमच्या बचावासाठी धावून येईल आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला सुंसवाद साधून पाठिंबा मिळविण्याची आणि समन्वयाने काम करण्याची गरज आहे. सहकार्य, सौहार्द, समन्वय हाच जीवनातील आनंदाचा झरा आहे. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुमच्या जोडीदाराला एखादी बाबा न सांगितल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल.

तुल राशी भविष्य (Sunday, September 30, 2018)

चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे – त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. प्रेम आशेचा किरण दाखवेल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. रोमँटिक गाणी, सुगंधी मेणबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मदिरा; तुमच्या जोडीदारासमवेत या सगळ्याचा आस्वाद घेणार आहात.

वृश्चिक राशी भविष्य (Sunday, September 30, 2018)

थोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. पत्नीशी सुसंवाद साधून स्वरमिलाफ साधणारा दिवस. नातेसंबधात कुटुंबातील दोन्ही व्यक्तीनी, गुंतवणूक ही प्रेम आणि विश्वासाशी बांधिलकी ठेवणारी असावी. जबाबदारी स्वीकारून योग्य प्रकारे पार पाडण्याची तयारी ठेवा. प्रणयराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल – म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवाल. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.

धनु राशी भविष्य (Sunday, September 30, 2018)

आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. प्रेमाचा आनंद घेता येईल. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

मकर राशी भविष्य (Sunday, September 30, 2018)

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणा-या लोकांना तुम्ही वचन द्यााल. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल.

कुम्भ राशी भविष्य (Sunday, September 30, 2018)

आयुष्याला गृहित धरून वागू नका, जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे हे लक्षात असू द्या. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील. काही लोक केवळ मनापासून स्मितहास्य करत एखाद्याला विरोध करू शकतात. तुम्ही जेव्हा इतरांच्या सान्निध्यात असता तेव्हा तुमचा वावर सुंगधी फुलासारखा दरवळतो. तुमची प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खात असल्यामुळे प्रणयराधन करणे दुय्यम प्राधान्याचे ठरण्याची शक्यता आज अधिक आहे. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. वैवाहिक आयुष्याकडून आवस्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दु:खी होण्याची शक्यता अधिक.

मीन राशी भविष्य (Sunday, September 30, 2018)

तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास प्रोत्साहन देतील. प्रेमप्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर संशय घेईल. पण दिवसाच्या शेवटी मात्र तो/ती समजून घेईल आणि तुम्हाला मिठीत घेईल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top