Connect with us

मंगळवार 30 ऑक्टोबर : या 3 राशींना करावा लागेल समस्यांचा सामना, तर 2 राशींना होणार धनलाभ

Today's Horoscope

मंगळवार 30 ऑक्टोबर : या 3 राशींना करावा लागेल समस्यांचा सामना, तर 2 राशींना होणार धनलाभ

आज मंगळवार 30 ऑक्टोबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Tuesday, October 30, 2018)

आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. तुमचा/तुमची प्रियकर/प्रेयसी दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईझ आखा आणि आजचा दिवस तुमच्या आय़ुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा/तुमची जोडीदार ही त्यापैकीच एक आहे.

वृषभ राशी भविष्य (Tuesday, October 30, 2018)

कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी भविष्य (Tuesday, October 30, 2018)

प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. प्रणयराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल – म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवाल. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.

कर्क राशी भविष्य (Tuesday, October 30, 2018)

एखादे झाड जसे स्वत: उन्हातान्हात असूनदेखील दुस-यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे.त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. आपल्या करिअरसंबंधी निर्णय स्वत:च घ्या, त्यांचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळथील, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल.

सिंह राशी भविष्य (Tuesday, October 30, 2018)

आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषकरून मद्यापान टाळा. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. तुमच्या अवतीभवतीच्या लोकांनाही लाभदायी ठरतील असे प्रकल्प अंमलात आणण्यास तुमची स्थिती अतिशय सक्षम आहे. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.

कन्या राशी भविष्य (Tuesday, October 30, 2018)

एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे – त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. प्रेमप्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमचे तुमच्या जोडीदाराशी दिवसभरात भांडण होईल, पण रात्री जेवताना मात्र हे वाद मिटून जातील.

तुल राशी भविष्य (Tuesday, October 30, 2018)

तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे! प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.

वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, October 30, 2018)

कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवं असतं, पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे. रोमान्सचा असीम आनंद घेण्यास तयार राहा.

धनु राशी भविष्य (Tuesday, October 30, 2018)

तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

मकर राशी भविष्य (Tuesday, October 30, 2018)

आयुष्याला गृहित धरून वागू नका, जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे हे लक्षात असू द्या. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियांसमवेत पार्टीसाठी जा. त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही तर आपली द्विधावस्था देखील नाहिशी होईल. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक रोमान्स मिळण्याची शक्यता आहे. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाºयांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

कुम्भ राशी भविष्य (Tuesday, October 30, 2018)

आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. आपल्या उदार स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊ देऊ नका. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाल शीघ्रकोपी बनवतील. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.

मीन राशी भविष्य (Tuesday, October 30, 2018)

तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. तुमचा सहकार्याचा दृष्टिकोन आणि विश्लेषण कौशल्य यामुळे तुम्ही लक्ष वेधून घ्याल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top