Connect with us

शुक्रवार 30 नोव्हेंबर : या चार राशीसाठी आनंद घेऊन आला आहे महिन्याचा शेवटचा शुक्रवार

Today's Horoscope

शुक्रवार 30 नोव्हेंबर : या चार राशीसाठी आनंद घेऊन आला आहे महिन्याचा शेवटचा शुक्रवार

आज शुक्रवार 30 नोव्हेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Friday, November 30, 2018)

तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल – त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. तुम्ही तुमच्या राग जाळून टाका नाहीतर राग तुम्हाला जाळून भस्मसात करेल. इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशिब फळफळेल – आणि पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल. तुमच्या वेळीच मदत करण्यामुळे एखाद्याचे प्राण वाचतील. या बातमीमुळे तुमचे कुटुंबीय तुमचा अभिमान बाळगतील, प्रेरित होतील. ब-याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटण दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमान्स जागा होणार आहे.

वृषभ राशी भविष्य (Friday, November 30, 2018)

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. रोमान्ससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काही तरी खास योजना आखा, आणि आजची सायंकाळ जास्तीतजास्त रोमॅण्टीक करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जे कराल ते परिपूर्ण पद्धतीने कराल – म्हणूनच तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना चांगले काम करून दाखवा आणि तुम्ही किती सक्षम आहात हेही दाखवून द्या. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल.

मिथुन राशी भविष्य (Friday, November 30, 2018)

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणावाचे मळभ असेल. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज तोडी मोकळीक हवी असेल.

कर्क राशी भविष्य (Friday, November 30, 2018)

मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. दिवसाच्या उत्तरार्धात होणारी एखाद्या जुन्या मित्राची भेट उल्हसित करेल. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी चढेल. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील.

सिंह राशी भविष्य (Friday, November 30, 2018)

तुमची शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी समतोल आहार घ्या. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना दहा वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका. कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसºया कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. कठोर परिश्रम आणि योग्य प्रयत्नांमुळे चांगले फळ आणि पारितोषिक मिळू शकते. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल.

कन्या राशी भविष्य (Friday, November 30, 2018)

तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. परंतु, चिंता करण्याचे कारण नाही – कारण निराशेपेक्षा आनंद-समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वत:ला गुंतवा. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल.

तुल राशी भविष्य (Friday, November 30, 2018)

तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल कारण तुमचा/तुमची जोडीदार उत्तम आहे. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. स्पर्श, चुंबने, मुके, मिठ्या या सर्वांचेच वैवाहिक आयुष्यात विशेष महत्त्व असते. त्या महत्त्वाचा आज तुम्हाला अनुभव येईल.

वृश्चिक राशी भविष्य (Friday, November 30, 2018)

मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील – तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.

धनु राशी भविष्य (Friday, November 30, 2018)

योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. आपल्यावर प्रेम करणा-या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. आयटी क्षेत्रातील व्यक्तींना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. पण यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपल्या विषयावर लक्ष केंद्रीत करून, सातत्याने काम करत राहण्याची गरज आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.

मकर राशी भविष्य (Friday, November 30, 2018)

जेवणात मीठाची गरज ही अपिरहार्य असते, आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुखाची गरज भासतेच. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे – कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरु नका. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल.

कुम्भ राशी भविष्य (Friday, November 30, 2018)

थोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. तुमचा/तुमची जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल.

मीन राशी भविष्य (Friday, November 30, 2018)

धार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. तुम्ही प्रेमात पडला आहात, याचं हे लक्षण आहे! तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, त्यांच्या कारकीर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. उत्तम अन्न, रोमँटिक क्षण; तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहेत.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top