Today's Horoscope

रविवार 30 डिसेंबर : आज या 4 राशींनी राहावे सावधान, प्रेम संबंधात येऊ शकतो दुरावा

आज रविवार 30 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Sunday, December 30, 2018)

तुमचा आजार तुमच्या दु:खाचे कारण ठरेल. लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल.

वृषभ राशी भविष्य (Sunday, December 30, 2018)

आयुष्याला गृहित धरून वागू नका, जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे हे लक्षात असू द्या. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळथील, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल.

मिथुन राशी भविष्य (Sunday, December 30, 2018)

तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे रोमॅण्टीक दिवसाचे वाटोळे करू शकतो. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचा/तुमची जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल.

कर्क राशी भविष्य (Sunday, December 30, 2018)

तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. परंतु, चिंता करण्याचे कारण नाही – कारण निराशेपेक्षा आनंद-समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात तर कुणीतरीह खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. काहींच्या मते लग्न म्हणजे भांडणं आणि सेक्स, आजा मात्र सगळं शांत आणि प्रसन्न असेल.

सिंह राशी भविष्य (Sunday, December 30, 2018)

उच्च कॅलरी असणारा आहार टाळा, आपल्या व्यायामाबद्दल आपुलकी, प्रामाणिकपणा असू द्या. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. प्रेमामध्ये जोरजबरदस्ती टाळा. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.

कन्या राशी भविष्य (Sunday, December 30, 2018)

आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले, की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला सरप्राइझ देण्याच्या तयारीत आहे; त्याला/तिला मदत करा.

तुल राशी भविष्य (Sunday, December 30, 2018)

तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसºयांना सांगण्याने त्या सोडविण्यासाठी त्यांची मदत घेणे संयुक्तिक ठरते. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. जे तुमच्यावर प्रेम करतात, ज्यांना तुमची काळजी आहे अशा लोकांशी व्यवस्थित वागा. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल.

वृश्चिक राशी भविष्य (Sunday, December 30, 2018)

आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. म्हणून अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी खास खरेदी करेल.

धनु राशी भविष्य (Sunday, December 30, 2018)

तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. चुकीचा निरोप गेल्यामुळे किंवा चुकीच्या संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमच्या दोघांमध्ये होणाऱ्या बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या नात्यावर दुष्परिणाम होईल.

मकर राशी भविष्य (Sunday, December 30, 2018)

ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका, त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्ना करा. आपल्या प्रियकर/प्रियसीशी सूड उगविण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने, आपल्या ख-या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. तुमचा/तुमची त्याच्या/तिच्या कामात इतका व्यस्त होईल, की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल.

कुम्भ राशी भविष्य (Sunday, December 30, 2018)

सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करुन त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणा-या लोकांना तुम्ही वचन द्यााल. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

मीन राशी भविष्य (Sunday, December 30, 2018)

अमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल कारण आजचा दिवस तुमचाच आहे. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close