Uncategorized

सोमवार 29 ऑक्टोबर : आज या 5 राशीसाठी राहील उत्तम दिवस, तर 3 राशीसाठी त्रासदायक

आज सोमवार 29 ऑक्टोबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Monday, October 29, 2018)

मोतीबिंदू असणा-या रुग्णांनी प्रदुषित वातावरणात जाणे टाळावे. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रभावी ठरणाºया आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. प्रणयराधना करण्याची भावना जोडिदाराकडून आज अनुभवता येईल. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी भविष्य (Monday, October 29, 2018)

दु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय ही बाब लक्षात ठेवा. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. ब-याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारणार आहे. त्यामुळे तुम्हाला परमानंद लाभणार आहे.

मिथुन राशी भविष्य (Monday, October 29, 2018)

वडील संपत्तीत आपल्याला बेदखल करतील, पण तुम्ही दु:खी होऊ नका. सुखसमृद्धीने मानसिक लाड खूप होतात, मात्र वंचनेच्या काळात आपण कणखर बनतो. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्यामते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील.

कर्क राशी भविष्य (Monday, October 29, 2018)

एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे. आजुबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे.

सिंह राशी भविष्य (Monday, October 29, 2018)

आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. कुटूंबातील सदस्यांसोबत संमेलन, एकत्रित कार्यक्रम केल्याने प्रत्येकाचा मूड चांगला बनेल. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपू जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.

कन्या राशी भविष्य (Monday, October 29, 2018)

तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, तसेच इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

तुल राशी भविष्य (Monday, October 29, 2018)

गरज नसलेले कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. यश आणि आनंद मिळण्यासाठी हा चांगला काळ आहे, म्हणून आपल्या निरंतर प्रयत्नांना आणि आपणास पाठिंबा देणाºया कुटुंबियांचे आभार माना. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

वृश्चिक राशी भविष्य (Monday, October 29, 2018)

तुमच्या पुढे जाण्यासाठी कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका. या सगळ्या फुकाच्या चिंता आणि काळज्या यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि कदाचित त्वचाविषयक समस्या उद्भवेल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल – परंतु, तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. आयटी क्षेत्रातील व्यक्तींना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. पण यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपल्या विषयावर लक्ष केंद्रीत करून, सातत्याने काम करत राहण्याची गरज आहे. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे.

धनु राशी भविष्य (Monday, October 29, 2018)

तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. दरदिवशी कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्क सहकार्य तुम्हाला मिळेल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की, तुमचा/तुमची तुमच्यासाठीच तयारी करत होता/होती.

मकर राशी भविष्य (Monday, October 29, 2018)

तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल. कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली अध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. तुमचे तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. प्रेमप्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. कोणा तिसऱ्याने कान फुंकल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल, पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल.

कुम्भ राशी भविष्य (Monday, October 29, 2018)

मानसिक भीतीने तुम्ही घाबरून जाल. सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकाल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल तर असेलच पण आपल्यासाठी खूपच मनोरंजक ठरेल. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. तुम्ही कामच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.

मीन राशी भविष्य (Monday, October 29, 2018)

निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. कामाच्या जागी आपण स्वत:ला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कुणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. किराणा मालाच्या खरेदीवरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल.

Related Articles

Back to top button