Uncategorized

बुधवार 28 नोव्हेंबर : आज या दोन राशींची पैश्याची समस्या दूर होणार

आज बुधवार 28 नोव्हेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Wednesday, November 28, 2018)

आरोग्य चांगले राहील. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टीकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. प्रवासाच्या संधी शोधाल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राइझ देणार आहे.

वृषभ राशी भविष्य (Wednesday, November 28, 2018)

तुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्याने दृढ करण्याचा दिवस. प्रेम प्रकरणामध्ये स्वत:हून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं किती महत्त्व आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

मिथुन राशी भविष्य (Wednesday, November 28, 2018)

आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. अंतिमत: आपले खाजगी आयुष्य हाच आपला प्रमुख लक्ष द्यायचा विषय असेल, पण आज तुम्ही सामाजिक, धर्मादाय कामावर लक्ष केंद्रीत कराल. आपल्या अडचणी प्रश्न घेऊन येणा-यांना तुम्ही मदत कराल. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. आज तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला त्याची/तिची सुस्वभावी बाजू दाखवेल.

कर्क राशी भविष्य (Wednesday, November 28, 2018)

स्वत:च स्वत:वर औषधोपचार करू नका, त्यामुळे औषधावर विसंबण्याची सवय वाढू शकेल. हुशारीने गुंतवणूक करा. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. तुमच्या साहेबाला कारणे दिलेली आवडणार नाहीत – त्यामुळे साहेबाकडे तुमचे नाव राहण्यासाठी काम करत राहा. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.

सिंह राशी भविष्य (Wednesday, November 28, 2018)

आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरुप येईल. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

कन्या राशी भविष्य (Wednesday, November 28, 2018)

उच्च कॅलरी असणारा आहार टाळा, ठरलेला व्यायाम आजिबात टाळू नका. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.

तुल राशी भविष्य (Wednesday, November 28, 2018)

आपल्या मित्रांबरोबरील अथवा कुटुंबियांबरोबरील रम्य सहली तुम्हाला आराम पोहचवतील. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील – तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. तुमचा/जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल.

वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, November 28, 2018)

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पण आरोग्यालाल गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील – परंतु केवळ गप्पा करणाºया लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील – लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे! प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.

धनु राशी भविष्य (Wednesday, November 28, 2018)

आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेमसफरीवर जाणार आहात. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मधे येऊ देऊ नका, इतरांना काय म्हणायचे आहे तेदेखील ऐका. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरु नका. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे.

मकर राशी भविष्य (Wednesday, November 28, 2018)

आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. आज तुम्ही जाणार असलेल्या विशेष एकत्रिकरण सोहळ्यात तुम्ही चमकणार आहात. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.

कुम्भ राशी भविष्य (Wednesday, November 28, 2018)

गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. आपल्या महत्वाकांक्षा ज्येष्ठांना सांगा, ते तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतील. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टीकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करेल.

मीन राशी भविष्य (Wednesday, November 28, 2018)

चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या – परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला आराम मिळवून देईल. तुमची प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खात असल्यामुळे प्रणयराधन करणे दुय्यम प्राधान्याचे ठरण्याची शक्यता आज अधिक आहे. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाल शीघ्रकोपी बनवतील. प्रवास-करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. आरामाअभावी तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात गुदमरल्यासारखे वाटेल. तुमच्या आयुष्यात सुसंवादाची आवश्यकता आहे.

Related Articles

Back to top button