horoscope

शनिवार 28 जुलै : कालच्या ग्रहणाचे शुभफल मिळणार आहे या 5 राशींना, तर इतरांसाठी सामान्य दिवस

आज शनिवार 28 जुलै चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Saturday, July 28, 2018)

आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा कौटुंबिक ताणतणाव दडपण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पण अनावश्यक काळजी तुमचा मानसिक ताण वाढवले. कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने जितक्या लवकर त्यावर मार्ग काढता येईल तेवढ्या लवकर मार्ग काढा. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या अनावश्यक मागण्यांकडे लक्ष देऊ नका पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. जर तुम्ही शांत राहिला नाहीत तर तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्याला काहीतरी गंभीर हानी पोहोचविण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी भविष्य (Saturday, July 28, 2018)

तुमच्या स्वत:साठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही साजरे करण्याच्या मूडमध्ये असाल आणि कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी यांच्यासाठी खर्च करून मजा लुटाल. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल – जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल.

मिथुन राशी भविष्य (Saturday, July 28, 2018)

भीती, चिंता तुमच्या सुखी समाधानी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो, जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमता अपंग होते. म्हणून चिंतेचा निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खुडून टाका. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. मित्रमंडळीसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल परंतु वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागेल. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या फवा पसरविण्याची शक्यता आहे. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल.

कर्क राशी भविष्य (Saturday, July 28, 2018)

अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. खर्च करताना पुढाकार घेऊ नका, अन्यथा रिकाम्या खिशाने घरी यावे लागेल. तुम्ही समूहामध्ये असता तेव्हा तुम्ही काय बोलता ते नीट पाहा – तडकाफडकी शेरेबाजी केल्याने तुमच्यावर जबरदस्त टीका होईल. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. तुमचे चुंबकसदृश सदा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल आणि तुमच्या जोडीदाराला मिठीत घ्याल.

सिंह राशी भविष्य (Saturday, July 28, 2018)

आपल्या वजनावर लक्ष ठेवा, अतिखाण्यात आनंद मानू नका. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुले सर्वतोपरीने प्रयत्न करतील. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.

कन्या राशी भविष्य (Saturday, July 28, 2018)

कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. मुलांवर आपली मते लादण्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा आपणास काय सांगायचे ते त्यांना समजण्यास मदत होईल असे करा, ते आपली मते स्वीकारतील. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

तुल राशी भविष्य (Saturday, July 28, 2018)

मानसिक स्पष्टता टिकविण्यासाठी संभ्रम आणि नैराश्यापासून दूर रहा. खर्च करताना पुढाकार घेऊ नका, अन्यथा रिकाम्या खिशाने घरी यावे लागेल. आजचा दिवस विशेष साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत कॅण्डललाईट डीनरचा आस्वाद घ्या. तुमचे प्रेम असफल ठरेल. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनांमुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी भविष्य (Saturday, July 28, 2018)

नशिबावर हवाला ठेवून न राहता, आपलं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्य ही एक आळसावलेली देवता आहे. गुंतवणूक करताना चढउतार खूप घातक ठरू शकतात – म्हणून पूर्ण काळजी घेऊन विचारांती गुंतवणूक करा. वादविवाद, दुस-यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. तुम्ही अवचित काही चुकीचे बोलाल किंवा कृती कराल तर अधिकारी व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाहीत. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा.

धनु राशी भविष्य (Saturday, July 28, 2018)

मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आजच्या दिवशी ज्या आर्थिक फायद्याची अपेक्षा होती, तो फायदा लवकर होणार नाही. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियांसमवेत पार्टीसाठी जा. त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही तर आपली द्विधावस्था देखील नाहिशी होईल. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमँटिक डेटवर घेऊन गेलात तर तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

मकर राशी भविष्य (Saturday, July 28, 2018)

आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. अर्थविषयक अनिश्चिततेमुळे तुमच्या मनात तणाव निर्माण होईल. आपणास आनंदी ठेवण्यासाठी पालक आणि मित्र त्यांच्यापरीने प्रयत्न करतील. दरदिवशी कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल.

कुम्भ राशी भविष्य (Saturday, July 28, 2018)

अति चिंतेने आणि तणावामुळे हायपरटेन्शन वाढेल. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमचे मानसिक दडपण कमी करणारा असेल. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा/तुमची जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल.

मीन राशी भविष्य (Saturday, July 28, 2018)

आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. तुमच्या जवळचे कुणीतरी अंदाज करता येणार नाही अशा मूडमध्ये असेल. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. तुमचे तुमच्या जोडीदाराशी दिवसभरात भांडण होईल, पण रात्री जेवताना मात्र हे वाद मिटून जातील.


Show More

Related Articles

Back to top button