Connect with us

शुक्रवार 27 जुलै : आज चंद्र ग्रहणाच्या दिवशी या 4 राशींना होईल फायदा, बाकीच्यांवर राहील अशुभ प्रभाव

Today's Horoscope

शुक्रवार 27 जुलै : आज चंद्र ग्रहणाच्या दिवशी या 4 राशींना होईल फायदा, बाकीच्यांवर राहील अशुभ प्रभाव

आज शुक्रवार 27 जुलै चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Friday, July 27, 2018)

तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. प्रेम प्रकरणामध्ये स्वत:हून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आज पुन्हा प्रेमात पडाल, कारण तो/ती यासाठी खरच लायक आहे.

वृषभ राशी भविष्य (Friday, July 27, 2018)

निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा. आपण जर योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक केली असेल तर नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचा मनमोहक स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्व यामुळे तुम्ही नवीन मित्र जोडाल आणि त्यांच्याशी संपर्क वाढवाल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल – कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा.

मिथुन राशी भविष्य (Friday, July 27, 2018)

आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. आपल्या मुलांच्या अभ्यासाबाबत काळजी करू नका. सध्या जरी तुम्ही काही प्रश्नांना सामोरे जात असाल तरी ते क्षणिक असतील, काळाप्रमाणे ते प्रश्न संपून जातील. कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

कर्क राशी भविष्य (Friday, July 27, 2018)

मित्राच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते, पण चित्त शांत ठेवा. त्यामुळे उध्वस्त न होता आपत्ती टाळून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. तुम्हाला एकाकी वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या कुटूंबियांची मदत घ्या. त्यामुळे नैराश्यापासून तुमचा बचाव होईल. परिणामी सुयोग्य, संयुक्तिक निर्णय घेण्यास तुम्हाला मदत होईल. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. दुस-या-तिस-या व्यक्तींकडून ऐकलेल्या बातम्या तपासून खात्री करून घ्या. . आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.

सिंह राशी भविष्य (Friday, July 27, 2018)

तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते आणि त्यांचा आजार आणखी वाढवू शकते. त्यांना ताबडतोब आराम मिळावा या दृष्टीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रणयराधना करण्याची भावना जोडिदाराकडून आज अनुभवता येईल. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मधे येऊ देऊ नका, इतरांना काय म्हणायचे आहे तेदेखील ऐका. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल.

कन्या राशी भविष्य (Friday, July 27, 2018)

वैरभाव महागात पडू शकतो. त्यामुळे आपल्या सहिष्णूतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीला धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरुपी फूट पडू शकते. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुमच्याजवळील अनुकंपेचा गुण आणि समजूतदारपणा याची गोमटी फळे मिळतील. परंतु, घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमुळे दबाव येणार नाही याची काळजी घ्या. सावधनता बाळगा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करु शकते. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल.

तुल राशी भविष्य (Friday, July 27, 2018)

प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा. कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरतो. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. मुलांबरोबरील वादामुळे नैराश्य येईल. प्रेमप्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. तुम्ही तुमचे ज्ञान व अनुभव इतरांना सांगितलात तर तुम्ही मान्यता पावाल. खाजगी आणि गोपनीय माहीत कधीही उघड करू नका. घरीकाम करणारा चाकर/मोलकरीण येणार नाही, त्यामुळे तुमच्या जोडीदारावर ताण येईल.

वृश्चिक राशी भविष्य (Friday, July 27, 2018)

तुम्हाला उत्तेजित करणा-या, उल्हसित करणाºया उपक्रमात स्वत:ला गुंतवा, त्यामुळे तुम्हाल बराच आराम मिळेल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रीत करून मेहनत करण्याची गरज आहे. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. तुम्हाला असं वाटेल की गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही आहेत, पण हा केवळ नकारात्मक विचार आहे. शक्य तेवढे सकारात्मक राहण्याचा विचार करा. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार आज शृंगार करताना दुखावले जाल. तेव्हा हळुवारपणा बाळगा.

धनु राशी भविष्य (Friday, July 27, 2018)

तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर, आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे प्रेमाने जवळ येणे, तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्यदेखील तुम्हाला तुमच्या चिंतांपासून दूर नेईल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. जुने संबंध, ओळखी आणि मित्रांची मदत होईल. आजच्या दिवशी तुम्हाला आजुबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वत:ला गुंतवा. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. विवाहानंतर पापाचं रुपांतर पुजेत होतं आणि आज तुम्ही भरपूर पुजा करणार आहात.

मकर राशी भविष्य (Friday, July 27, 2018)

सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणा-या हट्टी स्वभावाचा त्याग करा. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल, उद्दीष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या. आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली सतत आठवण ठेवतील. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल.

कुम्भ राशी भविष्य (Friday, July 27, 2018)

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. जमिनीच्या वादातून भांडणतंटा मारामारी उद्भवू शकते. हा प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या पालकांची मदत घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार वागलात तर नक्कीच आपले प्रश्न सुटू शकतात. अचानक प्रणयाराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एक सुंदरशी बाजू पाहायला मिळेल.

मीन राशी भविष्य (Friday, July 27, 2018)

तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरूरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल. त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करील. स्वत:च्या प्रयत्नाने तुम्ही तुमचे जीवन फॅशनेबल करू शकाल आणि इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वत: काम कराल. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. कामच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला बदल झालेला दिसून येईल. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top