Connect with us

गुरुवार 27 डिसेंबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी घेऊन आला आहे आर्थिक लाभ

Today's Horoscope

गुरुवार 27 डिसेंबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी घेऊन आला आहे आर्थिक लाभ

आज गुरुवार 27 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Thursday, December 27, 2018)

आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तुमच्या प्रेमभ-या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील.

वृषभ राशी भविष्य (Thursday, December 27, 2018)

तुमच्या वाईट सवयीमुळे तुमच्यावर बिकट प्रसंग ओढवू शकतो. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. तुम्हाला सोशल मीडीयावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल.

मिथुन राशी भविष्य (Thursday, December 27, 2018)

प्रकृतीची काळजी घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करा. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या जोडीदाराला सरप्राइझ देत राहा, नाही तर त्याला/तिला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल.

कर्क राशी भविष्य (Thursday, December 27, 2018)

आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, तुमचा/तुमची जोडीदार हे आज सिद्ध करेल.

सिंह राशी भविष्य (Thursday, December 27, 2018)

चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. स्वत:ची प्रशंसा करण्यात वेळ घालवू नका, त्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करा आणि आयुष्याचे मर्म समजून घ्या. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की, तुमचा/तुमची तुमच्यासाठीच तयारी करत होता/होती.

कन्या राशी भविष्य (Thursday, December 27, 2018)

तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. घरगुती प्रश्नांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी तुम्हाला आजुबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणूकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाईल.

तुल राशी भविष्य (Thursday, December 27, 2018)

अतिखाणे आणि उच्च कॅलरी आहार टाळणे गरजेचे आहे. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. आजच्या दिवशी घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोधळून आणि थकून जाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.

वृश्चिक राशी भविष्य (Thursday, December 27, 2018)

तुमच्या भावना खासकरून रागावर नियंत्रण ठेवा. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळित असणार नाही. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणयराधन कराल. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राइझ देणार आहे.

धनु राशी भविष्य (Thursday, December 27, 2018)

आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. आपण दिलेल्या मौल्यवान भेटवस्तूमुळेदेखील आनंदी उत्साही वातावरण तयार होणार नाही, कारण आपल्या प्रियकरा/प्रियसीकडून त्या भेटवस्तू नाकारल्या जाण्याची शक्यता आहे. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. याचे कारण काहीही असू शकते, स्वयंपाक, स्वच्छता, इतर घरकाम इत्यादी.

मकर राशी भविष्य (Thursday, December 27, 2018)

बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. आपल्या प्रियकर/प्रेयसीला न आवडणारे कपडे वापरू नका, त्यामुळे तो/ती नाराज होऊ शकते. आपल्या वरिष्ठ सहका-यांना आणि बॉसला आपल्या घरी बोलाविण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळथील, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल.

कुम्भ राशी भविष्य (Thursday, December 27, 2018)

आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.

मीन राशी भविष्य (Thursday, December 27, 2018)

आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाहीत. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅण्टीक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. नव्या तंत्राचा आणि कौशल्यांचा वापर करीअरमधील प्रगतीसाठी गरजेचे आहे. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे! तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही? आजच्या दिवशी लक्ष ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल.

More in Today's Horoscope

Trending

To Top