Connect with us

बुधवार 26 सप्टेंबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील त्रासदायक, तर 3 राशीसाठी उत्तम

Today's Horoscope

बुधवार 26 सप्टेंबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील त्रासदायक, तर 3 राशीसाठी उत्तम

आज बुधवार 26 सप्टेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Wednesday, September 26, 2018)

आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. स्वत:च्या खाजगी गोष्टी मार्गी लावण्यासाठी उदारमतवादी दृष्टीकोन ठेवा. मात्र आपल्या बोलण्याने आपली काळजी करणारे कोणी दुखावणार नाही याची दक्षता घ्या. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते, फुले, हवा, सूर्यप्रकाश, फुलपाखरे. तुम्हाला रोमँटिक गुदगुल्या होतील. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस हा अत्यंत रोमँटिक असणार आहे.

वृषभ राशी भविष्य (Wednesday, September 26, 2018)

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील – तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल – निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. रोमान्ससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काही तरी खास योजना आखा, आणि आजची सायंकाळ जास्तीतजास्त रोमॅण्टीक करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, त्यांच्या कारकीर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल.

मिथुन राशी भविष्य (Wednesday, September 26, 2018)

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.

कर्क राशी भविष्य (Wednesday, September 26, 2018)

अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. तुमची बांधिलकी फळेल आणि तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. स्वप्न सत्यात उतरलेले तुम्ही पाहाल. परंतु त्यामुळे हे यश डोक्यात जाऊ देऊ नका आणि सातत्याने प्रामाणिकपणे काम करीत राहा. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर संशय घेईल. पण दिवसाच्या शेवटी मात्र तो/ती समजून घेईल आणि तुम्हाला मिठीत घेईल.

सिंह राशी भविष्य (Wednesday, September 26, 2018)

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. वडिलांकडून मिळणारी कठोर वागणूक तुम्हाला दु:ख पोहोचवू शकते. पण तुम्ही शांतपणे सर्व घटनांचा विचार करून परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवावी. त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे प्रेम. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल, तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल.

कन्या राशी भविष्य (Wednesday, September 26, 2018)

खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील – लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमचा/तुमची जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल.

तुल राशी भविष्य (Wednesday, September 26, 2018)

तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. अनोख्या रोमान्सचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराला आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे.

वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, September 26, 2018)

तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभवती असलेल्या लोकांना प्रभावित करील. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाध आणू शकतात. तुमच्या साहेबाला कारणे दिलेली आवडणार नाहीत – त्यामुळे साहेबाकडे तुमचे नाव राहण्यासाठी काम करत राहा. आजच्या दिवशी घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोधळून आणि थकून जाल. तुमचा/तुमची जोडीदार आज गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची अधिक काळजी घेईल आणि त्यांना जास्त महत्त्व देईल.

धनु राशी भविष्य (Wednesday, September 26, 2018)

तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील – कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. आपल्यावर प्रेम करणा-या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील – आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.

मकर राशी भविष्य (Wednesday, September 26, 2018)

तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. आपल्या वाटेत येणा-या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे.

कुम्भ राशी भविष्य (Wednesday, September 26, 2018)

तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पु-या करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. विवाहानंतर पापाचं रुपांतर पुजेत होतं आणि आज तुम्ही भरपूर पुजा करणार आहात.

मीन राशी भविष्य (Wednesday, September 26, 2018)

मद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाता. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील. तुमचा मनमोहक स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्व यामुळे तुम्ही नवीन मित्र जोडाल आणि त्यांच्याशी संपर्क वाढवाल. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रीत करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top