Connect with us

बुधवार 26 डिसेंबर : आजचा दिवस 3 राशींना धनप्राप्ती करून देणार तर 2 राशींना होऊ शकते नुकसान

Today's Horoscope

बुधवार 26 डिसेंबर : आजचा दिवस 3 राशींना धनप्राप्ती करून देणार तर 2 राशींना होऊ शकते नुकसान

आज बुधवार 26 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Wednesday, December 26, 2018)

एखादे झाड जसे स्वत: उन्हातान्हात असूनदेखील दुस-यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे.त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. तुम्ही साथसंगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही – तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही – तुमचे हृदय ठकठक करणार नाही. कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत, विशेषत: तुम्ही धोरणीपणाने वागला नाहीत तर नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर संशय घेईल. पण दिवसाच्या शेवटी मात्र तो/ती समजून घेईल आणि तुम्हाला मिठीत घेईल.

वृषभ राशी भविष्य (Wednesday, December 26, 2018)

अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात. त्यामुळे त्यांच्या निष्पाप, निस्सीम आनंदात असताना त्यांच्याभोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. अचानक प्रणयाराधन करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही उत्फुल्लीत व्हाल. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुम्ही आयुष्यात अाल्याने तुमचा/तुमची जोडीदार स्वत:ला नशीबवान समजते आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या.

मिथुन राशी भविष्य (Wednesday, December 26, 2018)

सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की, त्यात काहीही वावगे नाही.

कर्क राशी भविष्य (Wednesday, December 26, 2018)

शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. कुटुंबाच्या आघाडीवर काही त्रासदायक प्रश्न निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदा-यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कुटुंबाच्या रागाला आमंत्रण देण्यासारखे आहे. पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. दोन ओळींमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक, कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल.

सिंह राशी भविष्य (Wednesday, December 26, 2018)

तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमच्या अवतीभवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका.

कन्या राशी भविष्य (Wednesday, December 26, 2018)

प्रचंड चिंता आणि तणावामुळे तुमची प्रकृती बिघडेल. गोंधळ व नैराश्य टाळा आणि मानसिक स्पष्टता ठेवा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. मित्र आणि जवळचे स्नेही मदतीचा हात पुढे करतील. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. प्रवासाच्या संधी शोधाल. तुमचा/तुमची तुमच्या प्रतिष्ठेला आज थोडासा धक्का पोहोचवेल.

तुल राशी भविष्य (Wednesday, December 26, 2018)

आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा अपेक्षा उद्ध्वस्त करुन टाकतात. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. आज कामकाज धकाधकीचे, थकविणारे ठरेल – परंतु तुमची मित्रमंडळी सोबत असल्यामुळे तुम्ही आनंदी आणि श्रांत मनोवृत्तीत राहाल. रोमान्ससाठी आजचा दिवस फार काही योग्य नाही, खºया प्रेमाची अनुभूती मिळणे अशक्य आहे. तुम्ही जे कराल ते परिपूर्ण पद्धतीने कराल – म्हणूनच तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना चांगले काम करून दाखवा आणि तुम्ही किती सक्षम आहात हेही दाखवून द्या. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असेल, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल.

वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, December 26, 2018)

तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नाते घट्ट करा. तुमची मुलेही घरातील शांतता, सौहार्द, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील. त्यामुळे तुम्हा उभयतांमध्ये अधिक उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्य तुम्हाला दोघांना अनुभवता येईल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुमच्या वेळीच मदत करण्यामुळे एखाद्याचे प्राण वाचतील. या बातमीमुळे तुमचे कुटुंबीय तुमचा अभिमान बाळगतील, प्रेरित होतील. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमचा/तुमची जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल.

धनु राशी भविष्य (Wednesday, December 26, 2018)

आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवा, त्यामुळे आपल्या एकांतवास आणि एकटेपणावर मात करता येईल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील – परंतु केवळ गप्पा करणाºया लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते, फुले, हवा, सूर्यप्रकाश, फुलपाखरे. तुम्हाला रोमँटिक गुदगुल्या होतील. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. तुम्ही आज असं काहीतरी करणार आहात, ज्यानं तुमचा/तुमची जोडीदार खूप एक्साइट होणार आहे.

मकर राशी भविष्य (Wednesday, December 26, 2018)

निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. अनपेक्षितपणे गोड बातमी समजल्याने तुमचा उत्साह वाढेल. तुमचया कुटुंबातील सदस्यांना ही बातमी सांगून तुम्ही आनंद द्विगुणित कराल. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमचे आयुष्य आज खरच खूप सुंदर असणार आहे कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केले आहे.

कुम्भ राशी भविष्य (Wednesday, December 26, 2018)

आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्रासून जाल. हुशारीने गुंतवणूक करा. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनास पाठिंबा देतील. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्हाला प्रणयराधन करता येणार नाही. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल.

मीन राशी भविष्य (Wednesday, December 26, 2018)

आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. प्रणयराधनेचा मूड अचानक बदलल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल.

More in Today's Horoscope

Trending

To Top