horoscope

गुरुवार 25 ऑक्टोबर : आज या 3 राशींवर माता लक्ष्मी प्रसन्न होणार, जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य

आज गुरुवार 25 ऑक्टोबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Thursday, October 25, 2018)

आरोग्य एकदम चोख असेल. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात तर कुणीतरीह खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जावा यासाठी तुमची आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज मनसोक्त गप्पा माराल.

वृषभ राशी भविष्य (Thursday, October 25, 2018)

तुमच्या चपळाईच्या कृतीने तुमचे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेले प्रश्न सुटतील. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. गेल्या काही दिवसांच्या अबोल्यानंतर तुम्ही आणि तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडला.

मिथुन राशी भविष्य (Thursday, October 25, 2018)

तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर, आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे प्रेमाने जवळ येणे, तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्यदेखील तुम्हाला तुमच्या चिंतांपासून दूर नेईल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. इतरांच्या सूचनांप्रमाणे काम करणे महत्त्वाचे असणारा दिवस. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. तुमच्या टीममधला सर्वात त्रासदायक व्यक्ती आज अचानक विचारी वाटू लागेल. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात, असे तुम्हाला वाटेल.

कर्क राशी भविष्य (Thursday, October 25, 2018)

तुमची शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी समतोल आहार घ्या. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. प्रणय करायला मिळण्याची शक्यता आहे परंतु कामुक भावना उद्दिपित झाल्याने जोडिदाराशी संबंध बिघडतील. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार काहीशी दुखावली जाण्याची शक्यता आहे.

सिंह राशी भविष्य (Thursday, October 25, 2018)

तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.

कन्या राशी भविष्य (Thursday, October 25, 2018)

तेलकट आणि तिखट आहार टाळा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे रोमॅण्टीक दिवसाचे वाटोळे करू शकतो. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल.

तुल राशी भविष्य (Thursday, October 25, 2018)

पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका, प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. कामाच्या ठिकाणा आज तुमचा दिवस आहे! आज तुम्ही स्वत:ची परीक्षा पाहाल – तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील – कोडी सोडवतील आणि अन्य काहीजण कथा-कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही; तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा.

वृश्चिक राशी भविष्य (Thursday, October 25, 2018)

तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे. कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो व चांगली प्रकृती बिघडण्याचा दाट संभव आहे. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. मुलांच्याबाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्या पेक्षा कमी अनुभवी व्यक्तींबाबत धीर धरा. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटण दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमान्स जागा होणार आहे.

धनु राशी भविष्य (Thursday, October 25, 2018)

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिलात तर खूप मोठा बदल घडू शकतो. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा/तुमची जोडीदार ही त्यापैकीच एक आहे.

मकर राशी भविष्य (Thursday, October 25, 2018)

आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. नातेवाईकांना भेट देण्याचा अनुभव तुम्हाला वाटला त्यापेक्षा बरा असेल. प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले, की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.

कुम्भ राशी भविष्य (Thursday, October 25, 2018)

राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. मित्र आणि नातेवाईक मदत करतील, त्यांच्या सहवासात तुम्ही बरेच आनंदी रहाल. तुमच्या रोमॅण्टिक जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला छळाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जावा यासाठी तुमची आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल.

मीन राशी भविष्य (Thursday, October 25, 2018)

मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. दूरच्या नातेवाईकांडून आलेली बातमी तुमचा दिवस उजळून टाकेल. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. तुमच्या जोडीदाराला सरप्राइझ देत राहा, नाही तर त्याला/तिला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल.

Show More

Related Articles

Back to top button
Close