Uncategorized

सोमवार 25 मार्च : आज भोलेनाथ करणार या 6 राशीवर कृपा, सगळ्या समस्या होणार दूर, मिळेल लाभ

आज सोमवार 25 मार्च चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Monday, March 25, 2019)

विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार काहीशी दुखावली जाण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी भविष्य (Monday, March 25, 2019)

निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल – परंतु, तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. आजा नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल.

मिथुन राशी भविष्य (Monday, March 25, 2019)

तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. आशा आकांक्षा सोडू नका, अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळेल, संयम सोडू नका.

कर्क राशी भविष्य (Monday, March 25, 2019)

मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. आपल्यावर प्रेम करणा-या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल कारण तुमचा/तुमची जोडीदार उत्तम आहे. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.

सिंह राशी भविष्य (Monday, March 25, 2019)

तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी दोन हात करू शकेल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. नातेवाईकांच्या भेटीमुळे आजचा दिवस सुखद आणि अनोखा असेल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. आपली ध्येयं, उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस. ती लवकरात लवकर साध्य करण्यासाठी न थांबता सातत्याने प्रयत्न करण्यासाठी तुमच्या शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण करा. या कामी आपल्या मित्रांची मदत घेऊ शकता. त्यामुळे तुमचे मनोधैर्याला चालना मिळेल आणि तुमचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एक सुंदरशी बाजू पाहायला मिळेल.

कन्या राशी भविष्य (Monday, March 25, 2019)

मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. अचानक प्रणयाराधन करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही उत्फुल्लीत व्हाल. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमच्या शृंगारिक वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे.

तुल राशी भविष्य (Monday, March 25, 2019)

उच्च कॅलरी असणारा आहार टाळा, आपल्या व्यायामाबद्दल आपुलकी, प्रामाणिकपणा असू द्या. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समयी मदत केली असेल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हे छोटेसे भावप्रदर्शनदेखील त्यांचा उत्साह वाढवू शकते. कृतज्ञता ही आयुष्याची खुमारी वाढवणारी असते आणि उपकार न मानणे हा दोष असतो. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.

वृश्चिक राशी भविष्य (Monday, March 25, 2019)

अपेक्षित मातांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शक्य झाल्यास धुम्रपान करणा-या आपल्या मित्रासोबत थांबणे टाळा, तुमच्या होणा-या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. प्रभावी ठरणाºया आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. या जगातली सर्वोच्च परमानंद हा दोन प्रेमात पडलेल्या व्यक्तींना मिळालेला असतो. होय, तुम्ही ते नशीबवान आहात. तुमच्याकडे उच्च ऊर्जाक्षमता आहे ती तुम्ही व्यावसायिक यशशिखरे गाठण्यासाठी वापरायला हवी. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आज आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे.

धनु राशी भविष्य (Monday, March 25, 2019)

व्यायामाच्या आधारे आपण आपले वजन नियंत्रणात ठेवू शकता. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकाला माफ करा. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका.

मकर राशी भविष्य (Monday, March 25, 2019)

हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणा-या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. अनोख्या रोमान्सचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. अतिस्पष्टवक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घाला. आपल्या व्यावसायिक स्थानाला त्यामूळे अगदी सहजपणे धक्का बसू शकतो. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. आजचा दिवस खूप रोमँटिक आहे. चांगले जेवण, सुवास आणि आनंद या तीनही घटकांचा संगम होऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत छान वेळ व्यतीत कराल.

कुम्भ राशी भविष्य (Monday, March 25, 2019)

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचा कुटूंबातील सदस्यांप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टिकोन यामुळे वायफळ वादावादी आणि टीका संभवते. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.

मीन राशी भविष्य (Monday, March 25, 2019)

तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नाते घट्ट करा. तुमची मुलेही घरातील शांतता, सौहार्द, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील. त्यामुळे तुम्हा उभयतांमध्ये अधिक उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्य तुम्हाला दोघांना अनुभवता येईल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्याबद्दल नंतर क्षमादेखील मागता, पण असे बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.

Related Articles

Back to top button