Connect with us

बुधवार 25 जुलै : आज या 4 राशीसाठी राहील संकटाचा काळ, रहा सावधान

Today's Horoscope

बुधवार 25 जुलै : आज या 4 राशीसाठी राहील संकटाचा काळ, रहा सावधान

आज बुधवार 25 जुलै चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Wednesday, July 25, 2018)

अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. गुंतवणूक करताना चढउतार खूप घातक ठरू शकतात – म्हणून पूर्ण काळजी घेऊन विचारांती गुंतवणूक करा. घरामध्ये तुमची मुलं तुमच्यासमोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील, कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पाहा. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे – कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार काहीशी दुखावली जाण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी भविष्य (Wednesday, July 25, 2018)

अति उत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखदायक असेल. सावधनता बाळगा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करु शकते. तुमचा द्वेष करणारी माणे आज तुम्हाला अधिक त्रासदायक भासू शकतील, ज्यामुळे तुमचा आक्रमकपणा वाढेल. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. आज खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल.

मिथुन राशी भविष्य (Wednesday, July 25, 2018)

राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मैत्र लाभेल. प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जावा यासाठी तुमची आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे.

कर्क राशी भविष्य (Wednesday, July 25, 2018)

तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. मुलांबरोबरील वादामुळे नैराश्य येईल. ब-याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करु शकतात. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

सिंह राशी भविष्य (Wednesday, July 25, 2018)

प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की, कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसूकपणे सकारात्मक विचार करेल. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारीपासून दूर रहा. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. रोजच्या वैवाहिक आयुष्यात, आजचा दिवस मात्र थोडासा वेगळा असणार आहे.

कन्या राशी भविष्य (Wednesday, July 25, 2018)

तुम्हाला आज थोडे अस्वस्थ वाटेल – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धावपळीमुळे तुम्ही थकून जाल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.

तुल राशी भविष्य (Wednesday, July 25, 2018)

अतिखाणे टाळा, तुमच्या वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. घरातील आलिशान चैनीच्या वस्तुंसाठी अतिखर्च करू नका. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. आज तुमच्या कामाची आज स्तुती होईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमची इच्छा नसताना तुमचा/तुमची तुम्हाला बाहेर जायला सांगेल किंवा तुमची बाहेर जाण्याची इच्छा असताना तुमचा/तुमची तुम्हाला घरी थांबवेल, ज्यामुळे तुमची चिडचिड होईल.

वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, July 25, 2018)

उघडयावरचे अन्नसेवन करताना विशेष काळजी घ्या. परंतु उगाचच तणाव घेऊ नका नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. तुम्ही प्रेमात पडला आहात, याचं हे लक्षण आहे! व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विवाह हे एक वरदान आहे, आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे.

धनु राशी भविष्य (Wednesday, July 25, 2018)

आपली तब्येत सुधारा, कारण कमजोर शरीर; मनाची अवस्थादेखील कमकुवत करते. आपण जर योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक केली असेल तर नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील – परंतु बोलताना सांभाळून बोला. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणयराधन कराल. कामाच्या ठिकाणी कुणीतरी तुमच्याशी गैरवर्तन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयार राहा. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. आज तुमच्या कामाची आज स्तुती होईल.

मकर राशी भविष्य (Wednesday, July 25, 2018)

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील समस्या बाजूला सारा आणि घर तसेच मित्रमंडळींमध्ये तुमची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करा. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन करील. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल.

कुम्भ राशी भविष्य (Wednesday, July 25, 2018)

तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली तर आवश्यकता भासल्यास प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. सकारात्मक विचारांच्या आणि पाठिंबा देणा-या मित्रांबरोबर बाहेर जा. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. दीर्घकालीन फायदा देणाºया प्रकल्पांवर काम करा. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. लग्न म्हणजे केवळ एक छताखाली राहणं नव्हे. एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं.

मीन राशी भविष्य (Wednesday, July 25, 2018)

तुमचे उद्धट वागणे तुमच्यावर उलटू शकते. सौजन्याने वागण्याची सवय अंगी बाणवणे यासाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा ठरेल. कारण सौजन्याने सभ्यतेने वागणारी व्यक्ती कोणताही शेलकी शेरा मारण्याआधी दहावेळा विचार करील. जर शेरा मारणे अत्यावश्यक ठरले तरी त्यामध्ये क्लृप्ती आणि हळुवारपणा असेल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागू नका, शांततेला मारक ठरू शकते. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. तुमच्या जोडीदाराला एखादी बाबा न सांगितल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top