horoscope

सोमवार 23 सप्टेंबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील त्रासदायक, तर या 3 राशीसाठी मजेदार

आज सोमवार 23 सप्टेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Monday, September 24, 2018)

आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.

वृषभ राशी भविष्य (Monday, September 24, 2018)

रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडविणे गरजेचे आहे. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. आज तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभी राहील.

मिथुन राशी भविष्य (Monday, September 24, 2018)

मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील – लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल. परंतु, इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका.

कर्क राशी भविष्य (Monday, September 24, 2018)

प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुमच्या खाजगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस रहा आणि निर्भयपणे वावरा. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.

सिंह राशी भविष्य (Monday, September 24, 2018)

तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशिब फळफळेल – आणि पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. प्रत्येकजण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे लक्षात ठेवा. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. विवाहानंतर पापाचं रुपांतर पुजेत होतं आणि आज तुम्ही भरपूर पुजा करणार आहात.

कन्या राशी भविष्य (Monday, September 24, 2018)

शाररीक वेदना आणि ताणतणावाचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. व्यवस्थित संवाद साधून आणि सहकार्याने जोडीदाराशी संबंध सुधारतील. तुमच्या प्रेमसंबंधावर आज विपरीत परिणाम संभवतो. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही, आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. तुमचा/तुमची त्याच्या/तिच्या कामात इतका व्यस्त होईल, की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल.

तुल राशी भविष्य (Monday, September 24, 2018)

चांगले इंटरेस्टिंग वाचन करून तुमच्या मनाला, विचारांना खाद्य पुरवा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. आपल्या कुटुंबाच्या गौप्य गोष्टींमुळे आश्चर्यचकित व्हाल. तुमची प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खात असल्यामुळे प्रणयराधन करणे दुय्यम प्राधान्याचे ठरण्याची शक्यता आज अधिक आहे. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले, की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमँटिक डेटवर घेऊन गेलात तर तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

वृश्चिक राशी भविष्य (Monday, September 24, 2018)

आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. आपल्या निर्णयात पालकांच्या मदतीची नितांत गरज असेल. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल

धनु राशी भविष्य (Monday, September 24, 2018)

दीर्घ आजाराशी लढा देताना स्वत:वरचा विश्वास हाच तुम्हाला हिरो ठरवू शकतो, हे ओळखा. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास प्रोत्साहन देतील. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर किती प्रेमक करतो/करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. तुम्हाला तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात, आणि आज तुम्हाला त्यांचा अनुभव येईल.

मकर राशी भविष्य (Monday, September 24, 2018)

आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. आजच्या दिवशी तुमच्याबद्दल वाईट विचार करणारी व्यक्ती, कटू संबंध संपविण्याचा प्रयत्न करेल, अर्थात त्याला आपण प्रतिसाद कसा देता त्यावर अवलंबून आहे. प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते, फुले, हवा, सूर्यप्रकाश, फुलपाखरे. तुम्हाला रोमँटिक गुदगुल्या होतील. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल आणि तुमच्या जोडीदाराला मिठीत घ्याल.

कुम्भ राशी भविष्य (Monday, September 24, 2018)

आरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या असाईनमेंटवर तुम्हाला जाता न आल्यामुळे तुम्हाला माघार घ्यावी लागेल, पण तुमचे तर्कशास्त्र वापरून पुढे जात राहा. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी चढेल. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. आज तुमच्या कामाची आज स्तुती होईल.

मीन राशी भविष्य (Monday, September 24, 2018)

आरोग्याची काळजी घ्या. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखदायक असेल. आपण दिलेल्या मौल्यवान भेटवस्तूमुळेदेखील आनंदी उत्साही वातावरण तयार होणार नाही, कारण आपल्या प्रियकरा/प्रियसीकडून त्या भेटवस्तू नाकारल्या जाण्याची शक्यता आहे. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल.


Show More

Related Articles

Back to top button