horoscope

बुधवार 24 ऑक्टोबर : आज या 3 राशींच्या मना सारखी कामे होणार, तर या 2 राशींना करावे लागतील कष्ट

आज बुधवार 24 ऑक्टोबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Wednesday, October 24, 2018)

कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. उद्यामशील लोकांसोबत भागीदारी कराल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते.

वृषभ राशी भविष्य (Wednesday, October 24, 2018)

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. इतर अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील मात्र आपल्या प्रयत्नांवर बरेच काही अवलंबून असेल. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासातरी दयाळूपणा दाखवा, प्रेम करा. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील – लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुमचा/ तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.

मिथुन राशी भविष्य (Wednesday, October 24, 2018)

विजयोत्सव साजरा केल्याने तुम्हाला अतीव आनंद मिळेल. मित्रमंडळींसमवेत हा आनंद साजरा करा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणा-या लोकांना तुम्ही वचन द्यााल. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल.

कर्क राशी भविष्य (Wednesday, October 24, 2018)

अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. पत्नीबरोबर खरेदी करणे आनंददायी ठरेल. एकमेकांना समजून घेणे आणि त्यानुसार वागणे यात वाढ होईल. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराला आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे.

सिंह राशी भविष्य (Wednesday, October 24, 2018)

खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतात भंग पावेल. कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. चुकीचा निरोप गेल्यामुळे किंवा चुकीच्या संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. तुम्ही कामच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होईल.

कन्या राशी भविष्य (Wednesday, October 24, 2018)

तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील – तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल – निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. तुमचे प्रियकर/प्रेयसी यांच्यावर तुम्ही हुकूमशाहीने गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवेल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपू जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.

तुल राशी भविष्य (Wednesday, October 24, 2018)

भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल – पुढे काय करायचे हे ठरविणे अवघड होऊन बसेल – इतरांची मदत घ्या. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.

वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, October 24, 2018)

आरोग्य चांगले राहील. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. रोमान्ससाठी आजचा दिवस फार काही योग्य नाही, खºया प्रेमाची अनुभूती मिळणे अशक्य आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल.

धनु राशी भविष्य (Wednesday, October 24, 2018)

विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मधेमधे थोडा आराम करा. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात. त्यामुळे त्यांच्या निष्पाप, निस्सीम आनंदात असताना त्यांच्याभोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. तुमच्या प्रेमसंबंधावर आज विपरीत परिणाम संभवतो. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल.

मकर राशी भविष्य (Wednesday, October 24, 2018)

अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया नका घालवू. एक लक्षात ठेवा वादविवाद चर्चांमधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतेच. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मैत्र लाभेल. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आजा जाणूनबुजून दुखावेल, ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल.

कुम्भ राशी भविष्य (Wednesday, October 24, 2018)

आपल्या मित्रांबरोबरील अथवा कुटुंबियांबरोबरील रम्य सहली तुम्हाला आराम पोहचवतील. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. उद्यामशील लोकांसोबत भागीदारी कराल. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. आयुष्य तुम्हाला अनेक आश्चर्याचे धक्के देत असतं, पण आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची एक अचंबित करणारी बाजू पाहणार आहात.

मीन राशी भविष्य (Wednesday, October 24, 2018)

सोशलाईज होण्याची चिंता भीती तुम्हाला उदास करेल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहिशी करा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते, ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला सरप्राइझ देण्याच्या तयारीत आहे; त्याला/तिला मदत करा.


Show More

Related Articles

Back to top button