Connect with us

रविवार 23 सप्टेंबर : बदललेल्या ग्रह चालीचा या 3 राशीवर होणार परिणाम

Today's Horoscope

रविवार 23 सप्टेंबर : बदललेल्या ग्रह चालीचा या 3 राशीवर होणार परिणाम

आज रविवार 23 सप्टेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Sunday, September 23, 2018)

अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. खाजगी आयुष्याबरोबरच कोणत्यातरी सामाजिक धर्मादाय कामात स्वत:ला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. पण ते काम करताना खाजगी आयुष्याला धक्का लागणार नाही हे देखील पाहावे लागेल. दोन्ही पातळ्यांवर समान लक्ष असणे गरजेचे आहे. कधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे? तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या जोडीदाराच्या उबदार प्रेमाच्या कुशीत तुम्हाला आज अगदी राजेशाही वाटेल.

वृषभ राशी भविष्य (Sunday, September 23, 2018)

आरोग्य एकदम चोख असेल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला आहे. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल

मिथुन राशी भविष्य (Sunday, September 23, 2018)

आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. तुम्हाला एकाकी वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या कुटूंबियांची मदत घ्या. त्यामुळे नैराश्यापासून तुमचा बचाव होईल. परिणामी सुयोग्य, संयुक्तिक निर्णय घेण्यास तुम्हाला मदत होईल. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे.

कर्क राशी भविष्य (Sunday, September 23, 2018)

आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. मुलांसमवेत वेळ घालविणे महत्त्वाचे ठरेल. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तिऱ्हाईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल.

सिंह राशी भविष्य (Sunday, September 23, 2018)

अपेक्षित मातांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शक्य झाल्यास धुम्रपान करणा-या आपल्या मित्रासोबत थांबणे टाळा, तुमच्या होणा-या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळीसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल परंतु वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागेल. आपल्या प्रेमिकेशी अश्लील चाळे करू नका. आज तुम्ही स्वत:ची परीक्षा पाहाल – तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील – कोडी सोडवतील आणि अन्य काहीजण कथा-कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल.

कन्या राशी भविष्य (Sunday, September 23, 2018)

तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं किती महत्त्व आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

तुल राशी भविष्य (Sunday, September 23, 2018)

आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल.

वृश्चिक राशी भविष्य (Sunday, September 23, 2018)

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास प्रोत्साहन देतील. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल.

धनु राशी भविष्य (Sunday, September 23, 2018)

तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. दूरच्या नातेवाईकाकडून दीर्घकाळ प्रतीक्षा असणारा संदेश आल्यामुळे, आपले संपूर्ण कुटुंब आणि विशेषत: आपल्याला आनंद होईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.

मकर राशी भविष्य (Sunday, September 23, 2018)

तुमच्या स्वत:साठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही स्वत:ची परीक्षा पाहाल – तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील – कोडी सोडवतील आणि अन्य काहीजण कथा-कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.

कुम्भ राशी भविष्य (Sunday, September 23, 2018)

आपल्या जीवनसाथीचा आनंददायी प्रेमळ मूड तुमचा दिवस उजळून टाकेल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहीती तुम्ही उघड करु नका. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल.

मीन राशी भविष्य (Sunday, September 23, 2018)

फूट पाडणारे विचार भावना आणि आवेग नियंत्रणात ठेवा. आपले प्रतिगामी विचार, जुनाट संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील. आपल्या विकासाला धक्का लागेल आणि भविष्यातील वाटचालीत अडथळे निर्माण होतील. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top