Uncategorized

शुक्रवार 23 नोव्हेंबर : या चार राशीसाठी उत्तम दिवस, संध्याकाळी मिळणार खुशखबर

आज शुक्रवार 23 नोव्हेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Friday, November 23, 2018)

संध्याकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. वैयक्तीक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.

वृषभ राशी भविष्य (Friday, November 23, 2018)

पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. आज तुम्ही प्रेम प्रदूषण पसरवाल. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे! तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही? आजच्या दिवशी लक्ष ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल.

मिथुन राशी भविष्य (Friday, November 23, 2018)

आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. दरदिवशी कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. महत्त्वाच्या कामाची फाईल सर्व बाबतीत चोख आणि परिपूर्ण असल्याची तुम्हाला खात्री असल्याशिवाय वरिष्ठांच्या हाती सोपवू नका. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. किराणा मालाच्या खरेदीवरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल.

कर्क राशी भविष्य (Friday, November 23, 2018)

तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल. कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली अध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. तुमचे तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे कारण तुम्ही सदासर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे.

सिंह राशी भविष्य (Friday, November 23, 2018)

तुमच्या स्वत:साठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. राग हा केवळे काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता, याची जाणीव ठेवा. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतुट आहे.

कन्या राशी भविष्य (Friday, November 23, 2018)

तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. घरात कोणतेही बदल करायचे असतील घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. अन्यथा त्यांचा रोष ओढवून घ्याल आणि आनंद गमावून बसाल. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाºयांनी शांत मनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका. तुमचे प्रयत्न तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. विवाहानंतर पापाचं रुपांतर पुजेत होतं आणि आज तुम्ही भरपूर पुजा करणार आहात.

तुल राशी भविष्य (Friday, November 23, 2018)

मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अतिखाणे दुस-या दिवशी त्रासदायक ठरू शकते. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचा जोडीदार काळजी घेईल. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. भागीदारी तत्त्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो. पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. प्रवास-करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.

वृश्चिक राशी भविष्य (Friday, November 23, 2018)

जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि देखभाल करण्याची गरज असेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्हाला सुखकारक वाटेल. नवीन संयुक्तिक उपक्रम सुरू करण्याचा विचार असेल तर त्वरेने निर्णय घ्या. सध्या ग्रह आपणास अनुकूल आहेत. तुम्हाला जे हवे आहे ते करण्यास घाबरू नका. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज मनसोक्त गप्पा माराल.

धनु राशी भविष्य (Friday, November 23, 2018)

सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. नातेवाईक तुमच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आणतील पण तुमच्याकडूनही काही मदतीची अपेक्षा ठेवतील. तुमचे प्रियकर/प्रेयसी यांच्यावर तुम्ही हुकूमशाहीने गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवेल. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.

मकर राशी भविष्य (Friday, November 23, 2018)

आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्रमंडळीसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल परंतु वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागेल. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल.

कुम्भ राशी भविष्य (Friday, November 23, 2018)

उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका, त्याने आजारी पडायची शक्यता अधिक आहे. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाध आणू शकतात. कामच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते आज त्या व्यक्तीशी तुमचा सुसंवाद होईल. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार काहीशी दुखावली जाण्याची शक्यता आहे.

मीन राशी भविष्य (Friday, November 23, 2018)

प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. जीवनसाथीचे आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. कामाच्या ठिकाणी व्यावसायिक विचारसरणीमुळे तुमचे कौतुक होईल. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.

Related Articles

Back to top button