horoscope

गुरुवार 23 ऑगस्ट : दत्तगुरूंची कृपा आज या 3 राशीवर राहील, होतील सर्व मनोकामना पूर्ण

आज गुरुवार 23 ऑगस्ट चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Thursday, August 23, 2018)

तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही स्वत:च्या आनंदाचा त्याग कराल. परंतु त्यामुळे रस आणि अपेक्षा दोघांचा तुटवडा असेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पु-या करण्याची काळजी घेईल. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही, आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा. वेगाने वाहन चालविणे टाळा. रस्त्यावरून जाताना धोका पत्करणे टाळा. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल आणि तुमच्या जोडीदाराला मिठीत घ्याल.

वृषभ राशी भविष्य (Thursday, August 23, 2018)

आपल्या आरोग्याची उगाच चिंता करु नका, त्यामुळे आपला आजार बिघडण्याची शक्यता आहे. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. बाहेरगावी जाऊन पार्टी करणे, प्रणयराधन करायला मिळण्याची शक्यता असल्याने उत्साह निर्माण होईल परंतु त्यामुळे तुम्ही थकून जाल. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यात संयमाची परीक्षा घेणारा आहे. शांत राहा आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवा.

मिथुन राशी भविष्य (Thursday, August 23, 2018)

आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. कार्यालयातील ताणतणाव घरापर्यंत येऊ देऊ नका. त्याने आपल्या कुटुंबाच्या सुखाला धक्का बसू शकतो. कार्यालयातील प्रश्न कार्यालयातच सोडविणे श्रेयस्कर आहे, जेणेकरून घरी कौटुंबिक सुखाचा आनंद घेता येईल. आज तुम्ही तुमची प्रिय व्यक्ती सोबत नसल्याबद्दल खूप खंत कराल. तुम्ही कामाचा ताण घेतलात तर इतर कुणाला नाही, तर तुम्हालाच त्याचा त्रास होईल. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होण्याची शक्यता आहे.

कर्क राशी भविष्य (Thursday, August 23, 2018)

विनाकारण स्वत:ची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. जोडीदारासोबत प्रणय आराधना करण्यास गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही केलेली गणिते फलदायी ठरतील. त्यामुळे तुम्ही वेळेवर प्रकल्प पूर्ण करू शकाल. नवीन प्रकल्प हाती घेण्यासही ही योग्य वेळ आहे. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील.

सिंह राशी भविष्य (Thursday, August 23, 2018)

ताणतणावावर मात करण्यासाठी शांत आराम देणारे संगीत ऐका. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे तुम्ही निर्माण कराल. एकतर्फी प्रेमावर वेळ वाया घालवू नका. तुमची विचार करता त्यापेक्षा अधिकच तुम्ही पडद्यामागे जात आहात असे तुम्हाला आज लक्षात येइल. पुढील काही दिवसांत चांगल्या संधी तुम्हाला मिळतील. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या फवा पसरविण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे घरी गेल्यावर तुम्हाला रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

कन्या राशी भविष्य (Thursday, August 23, 2018)

तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. आजच्या दिवशी ज्या आर्थिक फायद्याची अपेक्षा होती, तो फायदा लवकर होणार नाही. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. तुम्ही कदाचित एखाद्या कटाचे लक्ष्य होत आहात, असे तुम्हाला वाटू शकेल. अनपेक्षित प्रवास घडतील. त्यामुळे तणाव आणि धावपळ होईल. तुमच्या जोडीदाराला एखादी बाबा न सांगितल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल.

तुल राशी भविष्य (Thursday, August 23, 2018)

चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. प्रेम आशेचा किरण दाखवेल. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. रोमँटिक गाणी, सुगंधी मेणबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मदिरा; तुमच्या जोडीदारासमवेत या सगळ्याचा आस्वाद घेणार आहात.

वृश्चिक राशी भविष्य (Thursday, August 23, 2018)

थोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहीती तुम्ही उघड करु नका. तुम्हाला तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुमचा/तुमची जोडीदार आज रोमँटिक मूडमध्ये आहे.

धनु राशी भविष्य (Thursday, August 23, 2018)

खेळ आणि आऊटडोअर अ‍ॅक्टीव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळविण्यास सहाय्यभूत ठरेल. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. प्रेमाचा आनंद घेता येईल. तुमच्या टीममधला सर्वात त्रासदायक व्यक्ती आज अचानक विचारी वाटू लागेल. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

मकर राशी भविष्य (Thursday, August 23, 2018)

कामामध्ये मर्यादेपलिकडे स्वत:ला खेचू नका, योग्य ती विश्रांती घेण्याची आठवण ठेवा. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील. मुलीचे आजारपण तुमचा मूड खराब करु शकते. ती तिच्या आजारवर मात करु शकेल असे चैतन्य, प्रेमाने तिच्यामध्ये निर्माण करा. प्रेमामध्ये कोणतेही दुख दूर सारण्याची ताकद आहे. अतिभावनाप्रधानता तुमचा दिवस उद्ध्वस्त करेल. विशेषत: आपली प्रिय व्यक्ती दुस-यांशी अतिमित्रत्त्वाने वागताना पाहून तुम्हाला त्रास होईल. जर आज तुम्ही कामावर एकाग्रता दाखवली नाही तर तुमच्या वरिष्ठांच्या आणि सहकाऱ्यांच्या मनात असलेल्या तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. आजच्या दिवशी तुमच्या क्षमता आणि कमतरता दिसून येतील. आजचा दिवस काहीसा कठीण असणार आहे.

कुम्भ राशी भविष्य (Thursday, August 23, 2018)

मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. आपला किंमती वेळ त्यांच्या बरोबर घालवा. पुन्हा एकदा आनंदी सोनेरी दिवस येण्यासाठी आपल्या रम्य आठवणीचा आधार घ्या. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजुबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. तुमच्या शीघ्रकोपीपणामुळे तुमच्या कामाच्या प्रगतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम घालवू नका. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. आज गुलाबांचा रंग अधिक लाल दिसेल आणि व्हायोलेट्ससुद्धा गडद निळे दिसतील, कारण प्रेमाची नशा तुम्हाला भरपूर चढणार आहे.

मीन राशी भविष्य (Thursday, August 23, 2018)

चार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. बंदिस्त किल्ल्याप्रमाणे स्वत:भोवती सुरक्षित चौकट आखून त्याचाच विचार करण्याची जीवनशैली तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी मारक आहे. तुम्हाला ही जीवनशैली चिंताग्रस्त आणि उदास बनवणारी असते. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास प्रोत्साहन देतील. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. आपण जर परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर अर्ज करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल, तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल.


Show More

Related Articles

Back to top button