Uncategorized

मंगळवार 20 नोव्हेंबर : आज या तीन राशींच्या कुंडली मध्ये बनत आहे राजयोग, होणार मालामाल

आज मंगळवार 20 नोव्हेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Tuesday, November 20, 2018)

आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल – परंतु, तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. अनोख्या रोमान्सचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. आज वैवाहिक आयुष्यात एक छान डिनर आणि मस्त झोप मिळणार आहे.

वृषभ राशी भविष्य (Tuesday, November 20, 2018)

आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. आपल्या जुन्या मित्राच्या भेटीमुळे आजची सायंकाळ बहरून जाईल. सोनेरी दिवसांच्या बालपणीच्या रम्य आठवणीत रंगून जाल. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल.

मिथुन राशी भविष्य (Tuesday, November 20, 2018)

आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. संध्याकाळ उजाडताच प्रियाराधन करण्याकडे तुमचा कल वाढेल. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे – म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. तुमचा/ तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.

कर्क राशी भविष्य (Tuesday, November 20, 2018)

काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये आणखी मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नीतीधैर्य उंचावेल. इतरांसाठी आदर्शवत ठरण्यासाठी तुम्ही मेहनत करा. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे रोमॅण्टीक दिवसाचे वाटोळे करू शकतो. तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे, कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल.

सिंह राशी भविष्य (Tuesday, November 20, 2018)

निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल.

कन्या राशी भविष्य (Tuesday, November 20, 2018)

उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खासकरून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल तर असेलच पण आपल्यासाठी खूपच मनोरंजक ठरेल. प्रणयराधन करण्याचा योग खूप उत्साहाचा असला तरी खूप काळपर्यंत रंगणार नाही. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.

तुल राशी भविष्य (Tuesday, November 20, 2018)

तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. अतिरिक्त ज्ञान व कौशल्ये शिकून घेण्यासाठई तुम्ही अतिरिक्त वेळ आणि ऊर्जा खर्च केलीत तर त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा/तुमची जोडीदार ही त्यापैकीच एक आहे.

वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, November 20, 2018)

तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुम्ही वेळीच योग्य ती मदत केल्याने एखाद्याचे नशिबाचे भोग टळतील. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरित प्रतिक्रिया मिळेल.

धनु राशी भविष्य (Tuesday, November 20, 2018)

खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. आज तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या आणि तुमच्या कुटूंबीयांसमवेत काही प्रेमाचे क्षण अनुभवा. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. कामामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा – परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. स्पर्श, चुंबने, मुके, मिठ्या या सर्वांचेच वैवाहिक आयुष्यात विशेष महत्त्व असते. त्या महत्त्वाचा आज तुम्हाला अनुभव येईल.

मकर राशी भविष्य (Tuesday, November 20, 2018)

नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल – म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका – थोडी विश्रांती घ्या आणि आजच्या भेटीगाठींच्या वेळा पुढे ढकला. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.

कुम्भ राशी भविष्य (Tuesday, November 20, 2018)

तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. आज तुम्ही एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार, रोमान्सने भरलेले असेल ज्यात फक्त तुम्ही आणि तुमचा जोडीदार असे दोघेच असाल.

मीन राशी भविष्य (Tuesday, November 20, 2018)

खासकरून हृदयविकाराच्या रुग्णांनी कॉफी प्राशन करणे सोडावे. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. मुलांना त्यांचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करा. त्यासाठी वेळ काढा. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. कामच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते आज त्या व्यक्तीशी तुमचा सुसंवाद होईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. जेव्हा तुमचा/तुमची जोडीदार विस्मयकारक असते/असतो तेव्हा आयुष्य मोहक असते, तुम्ही आज हाच अनुभव घेणार आहात.

Related Articles

Back to top button