horoscope

बुधवार 19 डिसेंबर : या 3 राशींना होणार आर्थिक लाभ तर 2 राशीसाठी कठीण काळ

आज बुधवार 19 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Wednesday, December 19, 2018)

येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हसित राहा, त्यातूनच तुम्हा आधिक ऊर्जा मिळेल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. तुमच्या दुराग्रही वागण्यामुळे घरातील लोक दुखावतील आणि त्याचबरोबर तुमचे जवळचे मित्रही दुखावले जातील. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका, प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रीत करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. आपल्या वाटेत येणा-या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. तुमच्या जोडीदाराला सरप्राइझ देत राहा, नाही तर त्याला/तिला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल.

वृषभ राशी भविष्य (Wednesday, December 19, 2018)

खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा – आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. मित्रपरिवार आणि नातेवाईकांबरोबर मजा करा. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. आपल्या वरिष्ठांना गृहित धरू नका. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. जर तुम्ही कुणालातरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल.

मिथुन राशी भविष्य (Wednesday, December 19, 2018)

आपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपल्या नातेसंबंधाना धक्का बसू शकतो. खुल्या मनाने विचार करणे आणि कोणाही बद्दलचे पूर्वग्रह सोडून देण्याने आपल्या या स्वभावावर मात करू शकता. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. तुम्ही साथसंगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही – तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही – तुमचे हृदय ठकठक करणार नाही. अनेक दिवस प्रलंबित असणाºया निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवे संयुक्तिक प्रकल्प मार्गी लागतील. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. थोडीशी एक्साइटमेंट शोधा.

कर्क राशी भविष्य (Wednesday, December 19, 2018)

निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमचे धैर्य पाहून तुम्ही प्रेर्म ंजकाल. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका.. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.

सिंह राशी भविष्य (Wednesday, December 19, 2018)

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. चढउतारांमुळे फायदा होईल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. आपलं काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रीत करा. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा तुमच्या जोडीदाराच्या उबदार प्रेमाच्या कुशीत तुम्हाला आज अगदी राजेशाही वाटेल.

कन्या राशी भविष्य (Wednesday, December 19, 2018)

भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. भावनिक धोका पत्करणे लाभदायक ठरेल. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरुप येईल. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

तुल राशी भविष्य (Wednesday, December 19, 2018)

विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाल. त्यानिमित्ताने जंगी पार्टी देऊन आपला आनंद साजरा करा. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे/भागादाराकडे दुर्लक्ष केले तर तो किंवा ती नाराज होतील. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.

वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, December 19, 2018)

पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या जवळचे कुणीतरी अंदाज करता येणार नाही अशा मूडमध्ये असेल. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत.

धनु राशी भविष्य (Wednesday, December 19, 2018)

घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. तुमच्या उदार वागणुकीचा तुमचे नातेवाईक विनासायास फायदा घेण्याची शक्यता आहे. म्हणून आताच नियंत्रण करा अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. उदार वागणूक ही काही मर्यादेपर्यंत चांगली असते हे तुम्ही लक्षात ठेवा. पण मर्यादेच्या बाहेर जाऊन तुम्ही औदार्य दाखवाल तर त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. रोमान्सची संधी स्पष्ट दिसेल, पण ते क्षणकाल टिकणारे असेल. कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केलीत तर सहकाºयांना राग येऊ शकतो – कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील.

मकर राशी भविष्य (Wednesday, December 19, 2018)

एखादे झाड जसे स्वत: उन्हातान्हात असूनदेखील दुस-यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे.त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. कर्मकांडे अथवा शुभकार्याचे सोहळे घरीच केलेले चांगले ठरतील. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा तुमचा/तुमची जोडीदार सॅकेरिनपेक्षाही गोड आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

कुम्भ राशी भविष्य (Wednesday, December 19, 2018)

दु:खी कष्टी आणि निराश होऊन खिन्न होऊ नका. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. दूरवरच्या नातेवाईकाकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, त्यांच्या कारकीर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका, आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल.

मीन राशी भविष्य (Wednesday, December 19, 2018)

आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे आणि जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवा. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. आजा नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल.

Show More

Related Articles

Back to top button
Close