Connect with us

मंगळवार 18 सप्टेंबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील त्रासदायक तर 3 राशीसाठी आनंदी

Today's Horoscope

मंगळवार 18 सप्टेंबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील त्रासदायक तर 3 राशीसाठी आनंदी

आज मंगळवार 18 सप्टेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Tuesday, September 18, 2018)

छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. संध्याकाळ उजाडताच प्रियाराधन करण्याकडे तुमचा कल वाढेल. सुयोग्य कर्मचा-यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.

वृषभ राशी भविष्य (Tuesday, September 18, 2018)

दु:खी कष्टी आणि निराश होऊन खिन्न होऊ नका. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. आज तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करा परंतु मुलांसोबत अधिक गोडीगुलाबीने, उदार मनाने वागलात तर तुम्हाला त्रास होईल. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र/मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे! प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.

मिथुन राशी भविष्य (Tuesday, September 18, 2018)

अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया नका घालवू. एक लक्षात ठेवा वादविवाद चर्चांमधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतेच. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिलात तर खूप मोठा बदल घडू शकतो. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.

कर्क राशी भविष्य (Tuesday, September 18, 2018)

तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्यादजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. विवाहित जोडपी एकत्र राहत असली तरी वातावरण नेहमीच रोमँटिक नसतं, पण आजचा दिवस मात्र खूप खूप रोमँटिक असणार आहे.

सिंह राशी भविष्य (Tuesday, September 18, 2018)

दुसºयांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका आणि तसे केले तर गुप्तपणे केल्या जाणाºया तुमच्यावरील शेरेबाजीलाही तुम्ही निष्प्रभ करू शकाल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. सहकुंटूब सामाजिक कार्यात सहभागी होण्याने अधिक आनंद मिळेल. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की, त्यात काहीही वावगे नाही.

कन्या राशी भविष्य (Tuesday, September 18, 2018)

कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुमच्या पालकांना आनंदी ठेवणे तुम्हाला कठीण वाटेल. म्हणून सकारात्मक निकाल मिळण्यासाठी तुम्ही पालकांच्या दृष्टिकोनातून पाहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना तुमचे प्रेम, वेळ आणि तुम्ही त्यांच्याकडे सातत्याने लक्ष दिलेले हवे आहे हेही समजून घ्या. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. वैवाहिक आयुष्याचा विचार करता आज तुमचे जीव खूप सुंदर झाले आहे.

तुल राशी भविष्य (Tuesday, September 18, 2018)

आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील – त्यामुळे तुम्ही तणावपूर्ण व्हाल आणि कमालीचे उदास व्हाल. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. प्रलंबित कामामुळे प्रचंड व्यस्त व्हाल – त्यामुळे आराम करायला आज फुरसत मिळणार नाही. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, September 18, 2018)

आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. जीवनसाथीचे आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात तर कुणीतरीह खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे, कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. आज तुमच्या कामाची आज स्तुती होईल.

धनु राशी भविष्य (Tuesday, September 18, 2018)

प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल.

मकर राशी भविष्य (Tuesday, September 18, 2018)

तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र, गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. वाईट सवयी तुम्हाला जडविण्यासाठी कारणीभूत ठरणा-या व्यक्तींपासून दूर राहा. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. कामकाजाच्या ठिकाणी होणा-या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील.

कुम्भ राशी भविष्य (Tuesday, September 18, 2018)

आरोग्य एकदम चोख असेल. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. रोमान्ससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काही तरी खास योजना आखा, आणि आजची सायंकाळ जास्तीतजास्त रोमॅण्टीक करण्याचा प्रयत्न करा. सुयोग्य कर्मचा-यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. दुसºयांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.

मीन राशी भविष्य (Tuesday, September 18, 2018)

अनेक चिंतांनी ग्रासल्यमुळे तुमची प्रतिकारक्षमता घटेल आणि विचारशक्ती कुंठेल. सकारात्मक विचारसरणी बाळगून या आजाराशी सामना करण्यासाठी स्वत:ला उत्तेजन द्या. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. क्वचित भेटीगाठी होणाºया लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल. तुमच्या सहकार्याच्या स्वभावामुळे कामाच्या ठिकाणी अपेक्षित निकाल मिळेल. तुमच्याकडे महत्त्वाच्या अनेक जबाबदाºया सोपवल्या जातील त्यामुळे कंपनीत तुमचे पद महत्त्वाचे ठरेल. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. तुमचा/ तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top