Connect with us

गुरुवार 18 ऑक्टोबर : जाणून घ्या माता लक्ष्मी कोणत्या राशीवर आहे प्रसन्न

Today's Horoscope

गुरुवार 18 ऑक्टोबर : जाणून घ्या माता लक्ष्मी कोणत्या राशीवर आहे प्रसन्न

आज गुरुवार 18 ऑक्टोबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Thursday, October 18, 2018)

कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. भूतकाळातील आनंदी क्षणांध्ये तुम्ही गुंतून जाल. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील – ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराला आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे.

वृषभ राशी भविष्य (Thursday, October 18, 2018)

चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. आज तुम्ही सहभागी झालेल्या सोशल कार्यक्रमात तुम्ही आकर्षणबिंदू ठराल. रोमान्ससाठी चांगला दिवस. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे.

मिथुन राशी भविष्य (Thursday, October 18, 2018)

मोतीबिंदू असणा-या रुग्णांनी प्रदुषित वातावरणात जाणे टाळावे. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. शेजा-याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात तर कुणीतरीह खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. कामच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला बदल झालेला दिसून येईल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारणार आहे. त्यामुळे तुम्हाला परमानंद लाभणार आहे.

कर्क राशी भविष्य (Thursday, October 18, 2018)

मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरु शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ घालते. म्हणून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा गोष्टी आणखी अवघड होतात. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.

सिंह राशी भविष्य (Thursday, October 18, 2018)

मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.

कन्या राशी भविष्य (Thursday, October 18, 2018)

आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वत:च्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीतकमी हस्तक्षेप करा, अन्यथा परावलंबित्व येऊ शकते. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.

तुल राशी भविष्य (Thursday, October 18, 2018)

कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरित प्रतिक्रिया मिळू शकेल.

वृश्चिक राशी भविष्य (Thursday, October 18, 2018)

तुमच्या भावना खासकरून रागावर नियंत्रण ठेवा. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील – परंतु बोलताना सांभाळून बोला. काहीजणांना अनोखा नवा रोमान्स हमखास लाभेल. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरुन जाईल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. ब-याच काळापासून ते वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.

धनु राशी भविष्य (Thursday, October 18, 2018)

आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. अतिस्पष्टवक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घाला. आपल्या व्यावसायिक स्थानाला त्यामूळे अगदी सहजपणे धक्का बसू शकतो. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. तुमचे आयुष्य आज खरच खूप सुंदर असणार आहे कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केले आहे.

मकर राशी भविष्य (Thursday, October 18, 2018)

आरोग्य एकदम चोख असेल. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. आज तुम्ही घरात आणि घराच्या अवतीभवती काही मोठे बदल करून घेण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. तुमच्या बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.

कुम्भ राशी भविष्य (Thursday, October 18, 2018)

विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मधेमधे थोडा आराम करा. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.

मीन राशी भविष्य (Thursday, October 18, 2018)

आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. दैनंदिन व्यस्ततेतून थोडा वेळ काढी आणि मित्रमंडळींसमवेत आज बाहेर जा. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्यासाठी सरसावेल. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा – परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top