horoscope

सोमवार 15 ऑक्टोबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील आर्थिक प्रगतीचा, तर 3 राशींना होईल त्रास

आज सोमवार 15 ऑक्टोबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Monday, October 15, 2018)

कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा, विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुमच्या उदार वागणुकीचा तुमचे नातेवाईक विनासायास फायदा घेण्याची शक्यता आहे. म्हणून आताच नियंत्रण करा अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. उदार वागणूक ही काही मर्यादेपर्यंत चांगली असते हे तुम्ही लक्षात ठेवा. पण मर्यादेच्या बाहेर जाऊन तुम्ही औदार्य दाखवाल तर त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण, अनर्थावह ठरेल. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मधे येऊ देऊ नका, इतरांना काय म्हणायचे आहे तेदेखील ऐका. तुमचे चुंबकीयसदृश आत्मविश्वासी आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाशझोतात आणेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज तोडी मोकळीक हवी असेल.

वृषभ राशी भविष्य (Monday, October 15, 2018)

गरज नसलेले कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. संध्याकाळी तुमच्या मुलांबरोबर काही आनंदाचा काळ घालवा. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला, एकमेकांत गुंफलेले. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची जास्त काळजी घेईल.

मिथुन राशी भविष्य (Monday, October 15, 2018)

दंतदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या निर्माण होईल. ताबडतोब आराम पडावा यासाठी वैद्याकीय सल्ला घ्या. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. मुलांसोबत वेळ घालवण्याची गरज आहे आणि त्यांना काही चांगली मूल्ये आणि त्यांच्या जबाबदा-या याविषयी काही सांगण्याची गरज आहे. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. प्रवसामुळे नवीन व्यवसाय संधी मिळतील. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या शृंगारिक वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे.

कर्क राशी भविष्य (Monday, October 15, 2018)

आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. क्षुल्लक वाद विसरू जेव्हा तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे.

सिंह राशी भविष्य (Monday, October 15, 2018)

मनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही यावर सहजपणे मात कराल. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील – कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. विवाहित जोडपी एकत्र राहत असली तरी वातावरण नेहमीच रोमँटिक नसतं, पण आजचा दिवस मात्र खूप खूप रोमँटिक असणार आहे.

कन्या राशी भविष्य (Monday, October 15, 2018)

कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना दहा वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका. कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसºया कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रेमभ-या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल.

तुल राशी भविष्य (Monday, October 15, 2018)

सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.

वृश्चिक राशी भविष्य (Monday, October 15, 2018)

आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे, काळजी घ्या. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. घरातील सुधारणाच्या कामांचा गांभीर्याने विचार करा. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल आणि त्यामुळे विवाहबंधन तोडण्यासाठी तुम्ही उद्युक्त होण्याची शक्यता आहे.

धनु राशी भविष्य (Monday, October 15, 2018)

प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. बहीण आपुलकीने वागल्यामुळे तुम्हाला उत्साह वाटेल. परंतु, त्यांच्या तुच्छ बोलण्यामुळे खूप रागावलात तर त्यामुळे तुमच्या हिताचेच नुकसान होईल. तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज मनसोक्त गप्पा माराल.

मकर राशी भविष्य (Monday, October 15, 2018)

तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. दूरवरच्या नातेवाईकाकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल – जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. व्यावसायिक उद्दीष्टे गाठण्यासाठी आपली ऊर्जा योग्य प्रकारे वळविण्यास अत्यंत योग्य काळ आहे. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या बाहुपाशात गुरफटून जाण्यासाठी आज भरपूर वेळ मिळणार आहे.

कुम्भ राशी भविष्य (Monday, October 15, 2018)

अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा – आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. तुमचा चमू एकत्र आणून सार्वत्रिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमची स्थिती आता अतिशय सशक्त आहे. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल..

मीन राशी भविष्य (Monday, October 15, 2018)

तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा. प्रेम प्रकरणामध्ये स्वत:हून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. आज तुम्हाला एक असा अनुभव मिळणार आहे, ज्याने तुम्ही आयुष्यातील दु:ख विसरून जाल.


Show More

Related Articles

Back to top button