astrology

शुक्रवार 15 मार्च : ग्रह-नक्षत्र करू शकतात गडबड, या 6 राशींनी राहावे सावध, वाढू शकतात समस्या

आज शुक्रवार 15 मार्च चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Friday, March 15, 2019)

चांगले इंटरेस्टिंग वाचन करून तुमच्या मनाला, विचारांना खाद्य पुरवा. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. आपल्या प्रियकर/प्रेयसीला न आवडणारे कपडे वापरू नका, त्यामुळे तो/ती नाराज होऊ शकते. काही काळ आपण केवळ स्वत:च्या जिवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असेल, सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असे दिसत नाही. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत शृंगार करायला भरपूर वेळ मिळेल, पण प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी भविष्य (Friday, March 15, 2019)

तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी दोन हात करू शकेल. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. अनुरुपांसाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरित प्रतिक्रिया मिळेल.

मिथुन राशी भविष्य (Friday, March 15, 2019)

आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वत:च्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीतकमी हस्तक्षेप करा, अन्यथा परावलंबित्व येऊ शकते. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणा-या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. भागीदारी तत्त्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो. पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल.

कर्क राशी भविष्य (Friday, March 15, 2019)

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. खाजगी आणि गोपनीय माहीत अजिबात उघड करू नका. तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनावर प्रणयराधन करण्याचे विचार घोळतील. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल.

सिंह राशी भविष्य (Friday, March 15, 2019)

आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तुमच्या प्रेमजीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. प्रेम आणि चविष्ट पदार्थ ही चांगल्या वैवाहिक आयुष्याची मूल तत्वे आहेत; आणि आज तुम्हाला त्याचाच अनुभव येणार आहे.

कन्या राशी भविष्य (Friday, March 15, 2019)

त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील. अनपेक्षित जबाबदारी आल्यामुळे तुमचे दिवसभराचे बेत रखडतील – तुम्ही दुस-यांसाठी बरेच काही कराल आणि स्वत:साठी काहीच करत नाही असे आढळेल. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल.

तुल राशी भविष्य (Friday, March 15, 2019)

खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निंरतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुमच्या मुलांसमवेत वेळ घालवा. प्रकृतीस बरे वाटेल. मुले ही अमर्यादित आनंदाचे स्रोत असतात. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण, अनर्थावह ठरेल. कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस रहा आणि निर्भयपणे वावरा. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल.

वृश्चिक राशी भविष्य (Friday, March 15, 2019)

दुसºयांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका आणि तसे केले तर गुप्तपणे केल्या जाणाºया तुमच्यावरील शेरेबाजीलाही तुम्ही निष्प्रभ करू शकाल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. तुम्हाला आज काही समस्या उद्भवतील – पण वास्तववादी राहा आणि मदत करणाºया लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतित कराल.

धनु राशी भविष्य (Friday, March 15, 2019)

मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. रोमान्ससाठी चांगला दिवस. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणावाचे मळभ असेल. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात, असे तुम्हाला वाटेल.

मकर राशी भविष्य (Friday, March 15, 2019)

तुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा, पण इतरांच्या कामापासून दूर रहा. तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमचा/तुमची जोडीदार आज खूप छान मूडमध्ये आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस व्हावा यासाठी फक्त तुम्ही त्याला/तिला थोडीशी मदत करण्याची गरज आहे.

कुम्भ राशी भविष्य (Friday, March 15, 2019)

स्वत:च उपचार ठरवून केलेत तर त्यामुळे औषधावर अवलंबून राहणे वाढेल. त्यामुळे तुमचे तुम्ही औषध घेण्याआधी डॉक्टरी सल्ला घेणे हिताचे ठरेल. अन्यथा औषधांवर अवलंबून राहणे वाढण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील – कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. घरातील दुरुस्तीची कामे अथवा सामाजिक भेटीगाठी तुम्हाला व्यस्त ठेवतील. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. काही काळ आपण केवळ स्वत:च्या जिवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असेल, सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असे दिसत नाही. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.

मीन राशी भविष्य (Friday, March 15, 2019)

तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्यादजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल मित्र चांगला सल्ला देतील. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका.. तुमच्या दोघांमध्ये होणाऱ्या बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या नात्यावर दुष्परिणाम होईल.


Show More

Related Articles

Back to top button