Connect with us

बुधवार 14 नोव्हेंबर : आज या 4 राशींना मिळणार खुशखबर, तर 2 राशींना येणार समस्या

Today's Horoscope

बुधवार 14 नोव्हेंबर : आज या 4 राशींना मिळणार खुशखबर, तर 2 राशींना येणार समस्या

आज बुधवार 14 नोव्हेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Wednesday, November 14, 2018)

कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. ऐतिहासिक स्थळांवर कुटुंबाची छोटीशी पिकनिक प्लॅन करा. त्यामुळे आपल्या कुटुंबियांना आणि मुलांच्या नीरस आयुष्यात घटकाभर मोकळीक मिळेल. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. स्पर्श, चुंबने, मुके, मिठ्या या सर्वांचेच वैवाहिक आयुष्यात विशेष महत्त्व असते. त्या महत्त्वाचा आज तुम्हाला अनुभव येईल.

वृषभ राशी भविष्य (Wednesday, November 14, 2018)

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. व्यवसायात नवी आघाडी सुरु करण्यासाठी शुभ दिवस. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. तुम्हाला सोशल मीडीयावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल.

मिथुन राशी भविष्य (Wednesday, November 14, 2018)

चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. आपल्या कुटुंबाच्या गौप्य गोष्टींमुळे आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल.

कर्क राशी भविष्य (Wednesday, November 14, 2018)

आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. सहकुंटूब सामाजिक कार्यात सहभागी होण्याने अधिक आनंद मिळेल. प्रेमप्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. आजच्या दिवशी तुमच्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम संधी चालून येतील. आयटी व्यावसायिकांसाठी परदेशातून नोकरीचा कॉल येण्याची शक्यता. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की, तुमचा/तुमची तुमच्यासाठीच तयारी करत होता/होती.

सिंह राशी भविष्य (Wednesday, November 14, 2018)

आज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील – परंतु बोलताना सांभाळून बोला. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. तुम्ही विनयशीलपणे आणि मदतीच्या भूमिकेतून वागलात तर तुमच्या भागीदाराकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.

कन्या राशी भविष्य (Wednesday, November 14, 2018)

तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. कर्मकांडे घरच्या घरीच करणे हिताचे ठरेल. प्रेम प्रकरणामध्ये स्वत:हून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. पगारातील वाढ तुम्हाला उल्हसित करेल. पूर्वीची उदासी आणि तक्रारी दूर सारण्याची हीच खरी वेळ आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. आजच्या दिवशी तुमचा/तुमची जोडीदार क्षणार्धात तुमची दु:ख दूर करेल.

तुल राशी भविष्य (Wednesday, November 14, 2018)

कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील – लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खासगी दिवस असेल.

वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, November 14, 2018)

इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. तुमच्या मुलांसमवेत वेळ घालवा. प्रकृतीस बरे वाटेल. मुले ही अमर्यादित आनंदाचे स्रोत असतात. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल – अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. तुमचा/तुमची त्याच्या/तिच्या कामात इतका व्यस्त होईल, की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल.

धनु राशी भविष्य (Wednesday, November 14, 2018)

तुम्हाला उत्तेजित करणा-या, उल्हसित करणाºया उपक्रमात स्वत:ला गुंतवा, त्यामुळे तुम्हाल बराच आराम मिळेल. चढउतारांमुळे फायदा होईल. तुमच्या वेळीच मदत करण्यामुळे एखाद्याचे प्राण वाचतील. या बातमीमुळे तुमचे कुटुंबीय तुमचा अभिमान बाळगतील, प्रेरित होतील. तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनावर प्रणयराधन करण्याचे विचार घोळतील. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमचे पालक तुमच्या जोडादीराला आज सुंदरशी बेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल.

मकर राशी भविष्य (Wednesday, November 14, 2018)

आरोग्य एकदम चोख असेल. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.

कुम्भ राशी भविष्य (Wednesday, November 14, 2018)

ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल – आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील प्रियाराधन, पाठलाग, लाडीगोडी या सगळ्याच्या आठवणी जागवून तुम्ही ताजेतवाने व्हाल.

मीन राशी भविष्य (Wednesday, November 14, 2018)

स्वत:च उपचार ठरवून केलेत तर त्यामुळे औषधावर अवलंबून राहणे वाढेल. त्यामुळे तुमचे तुम्ही औषध घेण्याआधी डॉक्टरी सल्ला घेणे हिताचे ठरेल. अन्यथा औषधांवर अवलंबून राहणे वाढण्याची शक्यता आहे. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले, की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. कामाच्या ठिकाणी जो तुमचा द्वेष करतो, त्याला एक साधे ‘हॅलो’ केलेत तर काहीतरी चांगले घडण्याची शक्यता आहे. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज एक उत्तम संध्याकाळ व्यतित करणार आहात.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top