horoscope

शुक्रवार 14 डिसेंबर : माता लक्ष्मीच्या कृपेने या 4 राशींच्या लोकांची पैश्यांची समस्या होणार दूर

आज शुक्रवार 14 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Friday, December 14, 2018)

तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. घरातील सुधारणाच्या कामांचा गांभीर्याने विचार करा. प्रेम आणि रोमान्स तुमचा मूड आनंदी राखतील. कामाच्या ठिकाणी जो तुमचा द्वेष करतो, त्याला एक साधे ‘हॅलो’ केलेत तर काहीतरी चांगले घडण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. अलीकडे काही विपरित घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल.

वृषभ राशी भविष्य (Friday, December 14, 2018)

मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही.

मिथुन राशी भविष्य (Friday, December 14, 2018)

अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कुटुंब-मुले आणि मित्रमंडळी यांच्यासमवेत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील – लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

कर्क राशी भविष्य (Friday, December 14, 2018)

आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषकरून मद्यापान टाळा. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल – परंतु, तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज तोडी मोकळीक हवी असेल.

सिंह राशी भविष्य (Friday, December 14, 2018)

तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तीशी संवाद न झाल्यामुळे उदासवाणा दिवस. तुमच्या प्रेमभ-या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. तुमच्या टीममधला सर्वात त्रासदायक व्यक्ती आज अचानक विचारी वाटू लागेल. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.

कन्या राशी भविष्य (Friday, December 14, 2018)

उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर काहीतरी मस्तीखोर, उत्साही करण्यासाठी एकदम योग्य दिवस. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईळ. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमँटिक डेटवर घेऊन गेलात तर तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

तुल राशी भविष्य (Friday, December 14, 2018)

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे – म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुम्ही आयुष्यात अाल्याने तुमचा/तुमची जोडीदार स्वत:ला नशीबवान समजते आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या.

वृश्चिक राशी भविष्य (Friday, December 14, 2018)

मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. संध्याकाळी तुमच्या मुलांबरोबर काही आनंदाचा काळ घालवा. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल

धनु राशी भविष्य (Friday, December 14, 2018)

इतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहितके ठरविताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. तुमचे चुंबकीयसदृश आत्मविश्वासी आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाशझोतात आणेल. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.

मकर राशी भविष्य (Friday, December 14, 2018)

आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्नसेवनाचा आनंद लुटा. तुमचा/तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे.

कुम्भ राशी भविष्य (Friday, December 14, 2018)

दंतदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या निर्माण होईल. ताबडतोब आराम पडावा यासाठी वैद्याकीय सल्ला घ्या. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. नातेवाईकांच्या भेटीमुळे आजचा दिवस सुखद आणि अनोखा असेल. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. प्रवसामुळे नवीन व्यवसाय संधी मिळतील. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळथील, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल.

मीन राशी भविष्य (Friday, December 14, 2018)

कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. मित्रमैत्रिणींबरोबर सायंकाळ घालवणे अथवा शॉपिंग करणे तुमच्यासाठी खूपच सुखदायी आणि उत्तेजित करणारे ठरू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे/भागादाराकडे दुर्लक्ष केले तर तो किंवा ती नाराज होतील. प्रलंबित कामामुळे प्रचंड व्यस्त व्हाल – त्यामुळे आराम करायला आज फुरसत मिळणार नाही. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरित प्रतिक्रिया मिळू शकेल.

Show More

Related Articles

Back to top button
Close