horoscope

मंगळवार 13 नोव्हेंबर : आज या 3 राशींना येतील समस्या तर 4 राशीसाठी आनंदाचा दिवस

 

आज मंगळवार 13 नोव्हेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Tuesday, November 13, 2018)

तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहात असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गूल व्हाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवं असतं, पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे. रोमान्सचा असीम आनंद घेण्यास तयार राहा.

वृषभ राशी भविष्य (Tuesday, November 13, 2018)

आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. आज तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या आणि तुमच्या कुटूंबीयांसमवेत काही प्रेमाचे क्षण अनुभवा. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. भागीदारी तत्त्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो. पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे.

मिथुन राशी भविष्य (Tuesday, November 13, 2018)

परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहिशी होईल.साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. आजच्या दिवशी तुम्ही अटेंड केलेल्या समारंभात मैत्रीचे नवे धागे जोडले जातील. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल.

कर्क राशी भविष्य (Tuesday, November 13, 2018)

नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल – म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका – थोडी विश्रांती घ्या आणि आजच्या भेटीगाठींच्या वेळा पुढे ढकला. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. आजा नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल.

सिंह राशी भविष्य (Tuesday, November 13, 2018)

संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. पवित्र आणि ख-या प्रेमाचा अनुभव येईल. स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे, धावपळीचे बनेल. दुसºयांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.

कन्या राशी भविष्य (Tuesday, November 13, 2018)

पैशांची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचा/तुमची तिच्या मित्रमैत्रिणींसमवेत जास्त काळ घालवेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित अस्वस्थ व्हाल.

तुल राशी भविष्य (Tuesday, November 13, 2018)

तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. तुमचा/तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल, ज्याचे पर्यवसान भांडणात होईल.

वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, November 13, 2018)

तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. कुटुंबाच्या आघाडीवर सारे काही सुरळित असेल, आणि तुमच्या योजनांमध्ये त्यांचा संपूर्ण पाठिंबा तुम्ही अपेक्षित धरू शकता. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल कारण आजचा दिवस तुमचाच आहे. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.

धनु राशी भविष्य (Tuesday, November 13, 2018)

अतिखाणे टाळा, तुमच्या वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. तुमचा प्रियकर/प्रेयसी आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. तुमच्या अवतीभवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका.

मकर राशी भविष्य (Tuesday, November 13, 2018)

मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल – म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. तुमच्यासारख्याच समान आवडीनिवडी असलेल्या व्यक्तींसोबत तुमची भेट घडेल. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.

कुम्भ राशी भविष्य (Tuesday, November 13, 2018)

पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. आज अचानक प्रणयाराधन करण्याचा योग आहे. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज मनसोक्त गप्पा माराल.

मीन राशी भविष्य (Tuesday, November 13, 2018)

आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल. चांगला काळ सदैव टिकून रहात नाही. माणसाच्या गरजा या ध्वनीलहरींप्रमाणे असतात. त्यांच्या उतारचढावामुळे कधी मुधर संगीत निर्माण होते तर कधी कर्कश आवाज. आपण जसे पेरु तसेच उगवते हे लक्षात ठेवा. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. संध्याकाळी तुमच्या मुलांबरोबर काही आनंदाचा काळ घालवा. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाºयांकडून टीका होईल. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमचा/तुमची जोडीदार आज खूप छान मूडमध्ये आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस व्हावा यासाठी फक्त तुम्ही त्याला/तिला थोडीशी मदत करण्याची गरज आहे.

Show More

Related Articles

Back to top button