horoscope

बुधवार 13 मार्च : क्रोध बिघडवू शकतो या 3 राशीचे काम, तर बाकी राशींचे वाढणार मनोबल

 

आज बुधवार 13 मार्च चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Wednesday, March 13, 2019)

आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. तुमचा फुरसतीचा वेळ हा निस्वार्थी कामासाठी द्या. त्यामुळे आपल्या आणि कुटुंबियांच्या आनंदात मोलाची भर पडेल. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजुबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. खूप काळापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम आज पूर्ण झाल्याने तुम्हाला खूप समाधान लाभेल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खासगी दिवस असेल.

वृषभ राशी भविष्य (Wednesday, March 13, 2019)

मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. प्रभावी ठरणाºया आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल कारण आजचा दिवस तुमचाच आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जावा यासाठी तुमची आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल.

मिथुन राशी भविष्य (Wednesday, March 13, 2019)

धार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास प्रोत्साहन देतील. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. तुम्ही प्रेमात पडला आहात, याचं हे लक्षण आहे! कामकाजाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढविण्यासाठी कौशल्य स्तर वाढवा. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, असं का म्हणतात, ते तुम्हाला आज कळेल.

कर्क राशी भविष्य (Wednesday, March 13, 2019)

आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. भावनिक आत्मविशास वाढविण्यासाठी प्रयत्न करणा-यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. आपल्या प्रिय व्यक्तीचे आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडविणे गरजेचे आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.

सिंह राशी भविष्य (Wednesday, March 13, 2019)

भीती, चिंता तुमच्या सुखी समाधानी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो, जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमता अपंग होते. म्हणून चिंतेचा निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खुडून टाका. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. आजच्या दिवशी आपल्या कुंटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे ही तुमची प्राथमिकता असेल. आजच्या दिवस रोमँटीक असण्याचे संकेत प्रबळ आहेत. तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. तुमचा/ तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.

कन्या राशी भविष्य (Wednesday, March 13, 2019)

तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नाते घट्ट करा. तुमची मुलेही घरातील शांतता, सौहार्द, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील. त्यामुळे तुम्हा उभयतांमध्ये अधिक उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्य तुम्हाला दोघांना अनुभवता येईल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. बहीण आपुलकीने वागल्यामुळे तुम्हाला उत्साह वाटेल. परंतु, त्यांच्या तुच्छ बोलण्यामुळे खूप रागावलात तर त्यामुळे तुमच्या हिताचेच नुकसान होईल. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल.

तुल राशी भविष्य (Wednesday, March 13, 2019)

सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग फलदायी ठरेल. मात्र मुलाखतीदरम्यान आपल्या मनाची स्थिरता कायम ठेवून स्वत:ला योग्य प्रकारे व्यक्त करण्याची गरज आहे. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. प्रेम आणि चविष्ट पदार्थ ही चांगल्या वैवाहिक आयुष्याची मूल तत्वे आहेत; आणि आज तुम्हाला त्याचाच अनुभव येणार आहे.

वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, March 13, 2019)

तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. यश आणि आनंद मिळण्यासाठी हा चांगला काळ आहे, म्हणून आपल्या निरंतर प्रयत्नांना आणि आपणास पाठिंबा देणाºया कुटुंबियांचे आभार माना. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या भावनिक मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. महत्त्वाच्या कामाची फाईल सर्व बाबतीत चोख आणि परिपूर्ण असल्याची तुम्हाला खात्री असल्याशिवाय वरिष्ठांच्या हाती सोपवू नका. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील.

धनु राशी भविष्य (Wednesday, March 13, 2019)

शाररीक वेदना आणि ताणतणावाचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल.

मकर राशी भविष्य (Wednesday, March 13, 2019)

स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. तुम्ही आयुष्यभर प्रेम केलेत तर तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी तुम्ही तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळित पार पडेल, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल, तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल.

कुम्भ राशी भविष्य (Wednesday, March 13, 2019)

देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. रोमान्सची संधी स्पष्ट दिसेल, पण ते क्षणकाल टिकणारे असेल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. ब-याच काळापासून ते वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे.

मीन राशी भविष्य (Wednesday, March 13, 2019)

मानसिक भीतीने तुम्ही घाबरून जाल. सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकाल. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलेत तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आजचा दिवस खूप रोमँटिक आहे. चांगले जेवण, सुवास आणि आनंद या तीनही घटकांचा संगम होऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत छान वेळ व्यतीत कराल.


Show More

Related Articles

Back to top button