horoscope

सोमवार 13 ऑगस्ट : आज भगवान शंकर या 4 राशींवर करणार आपली कृपा, मिळेल कामात यश

आज सोमवार 13 ऑगस्ट चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Monday, August 13, 2018)

आपणास हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे की, मानसिक आजार, शत्रू तुमच्या रोग प्रतिकारक शक्तीवरदेखील परिणाम करतात, म्हणूनच अनावश्यक विचारांना मनात अजिबात थारा देऊ नका. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन जर करमणुकीच्या कार्यक्रमास गेलात तर तो सर्वांसाठी आनंदी क्षण असेल. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल.

वृषभ राशी भविष्य (Monday, August 13, 2018)

आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. जमिनीच्या वादातून भांडणतंटा मारामारी उद्भवू शकते. हा प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या पालकांची मदत घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार वागलात तर नक्कीच आपले प्रश्न सुटू शकतात. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

मिथुन राशी भविष्य (Monday, August 13, 2018)

आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. मुलांकडून एखादी जबरदस्त बातमी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. आज सकाळी तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट मिळेल, ज्याने तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल.

कर्क राशी भविष्य (Monday, August 13, 2018)

नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्ना करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात आणून आपले आरोग्य सुस्थापित करण्यासाठी नव्याने व्यायाम सुरु करण्याची आत्यंतिक गरज आहे. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटा. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका, प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. नव्या तंत्राचा आणि कौशल्यांचा वापर हा बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी महत्त्वाचे आहे. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या फवा पसरविण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो/ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल.

सिंह राशी भविष्य (Monday, August 13, 2018)

यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुम्ही त्रस्त व्हाल. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. तुमचे अनियंत्रित चंचल वागणे यामुळे प्रिय व्यक्तीसोबत तुमचे मतभेद होतील. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर संशय घ्याल, ज्यामुळे तुमच्यातील एकोप्याला तडा जाऊ शकेल.

कन्या राशी भविष्य (Monday, August 13, 2018)

पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. तुमच्या आवाक्याच्या बाहेर तुमचा खर्च होईल. त्यामुळे अनेक चालू असलेले प्रकल्प-योजनांना खीळ बसेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात तर कुणीतरीह खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी स्त्री सदस्य तुमच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे.

तुल राशी भविष्य (Monday, August 13, 2018)

गॅसेसचा त्रास असणाºया पेशंटनी तेलकट आणि चरबीयुक्त आहार टाळणे अत्यावश्यक आहे, अन्यथा त्यांच्या आजारात वाढ होईल. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. आपली मते दुस-यांवर लादू नका, वादविवाद संघर्ष टाळण्यासाठी दुस-यांना काय सांगायचे आहे तेदेखील ऐकून घ्या. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल. तुमच्या कामाचा तणाव घालविण्यासाठी लागणारा वेळ मिळण्याची शक्यता आज कमी आहे. अनपेक्षित प्रवास घडतील. त्यामुळे तणाव आणि धावपळ होईल. विवाह हे एक वरदान आहे, आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे.

वृश्चिक राशी भविष्य (Monday, August 13, 2018)

तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्याने दृढ करण्याचा दिवस. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. मनाला रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील.

धनु राशी भविष्य (Monday, August 13, 2018)

तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे. कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो व चांगली प्रकृती बिघडण्याचा दाट संभव आहे. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. आपल्या निर्णयात पालकांच्या मदतीची नितांत गरज असेल. आपल्या प्रिय व्यक्तीमध्ये दोष शोधण्यात वेळ वाया घालवू नका. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असता तेव्हा वाद होणे साहजिक आहे. तुमचे तुमच्या जोडीदाराशी कदाचित भांडण होईल.

मकर राशी भविष्य (Monday, August 13, 2018)

तुमच्यापैकी काही जण बºयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे – आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील वादविवाद हे कुटुंबातील सदस्यांबरोबर गैरसमज व तणावाचे वातावरण निर्माण करतील. आपल्या प्रियजनाबरोबर शॉपिंगला गेल्यावर आक्रमक होऊ नका. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला जाणून घ्यायची नव्हती, नेमकी तिच गोष्ट तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आज सांगण्याची शक्यता आहे.

कुम्भ राशी भविष्य (Monday, August 13, 2018)

बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचावर कुठेही व्यवस्थित, नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. घरगुती कर्तव्ये टाळणे आणि पैशावरून भांडण करण्यामुळे आजच्या दिवशी तुमच्या वैवाहिक सुखात बाधा येवू शकते. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. तुम्ही अवचित काही चुकीचे बोलाल किंवा कृती कराल तर अधिकारी व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाहीत. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल.

मीन राशी भविष्य (Monday, August 13, 2018)

तुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपण जडवू शकतो. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईळ. तुम्ही अवचित काही चुकीचे बोलाल किंवा कृती कराल तर अधिकारी व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाहीत. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात.


Show More

Related Articles

Back to top button