horoscope

बुधवार 12 डिसेंबर : आज या चार राशीसाठी राहील मनोकामना पूर्ण करणारा दिवस तर दोन राशींना त्रासदायक

आज बुधवार 12 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Wednesday, December 12, 2018)

आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील. कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. एका मित्र/मैत्रिणीच्या समस्येमुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यांची चिंता वाटेल. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका, त्याऐवजी स्वत:हून नव्या संधींचा शोध घ्या. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल.

वृषभ राशी भविष्य (Wednesday, December 12, 2018)

तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. हुशारीने गुंतवणूक करा. तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करील. स्वत:च्या प्रयत्नाने तुम्ही तुमचे जीवन फॅशनेबल करू शकाल आणि इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वत: काम कराल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील – तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खासगी स्पेस आवश्यक आहे.

मिथुन राशी भविष्य (Wednesday, December 12, 2018)

त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका, प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमचा/तुमची जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल.

कर्क राशी भविष्य (Wednesday, December 12, 2018)

संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे तुम्ही निर्माण कराल. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुस-या कोणालाही घेऊ देऊ नका. प्रवासाच्या संधी शोधाल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.

सिंह राशी भविष्य (Wednesday, December 12, 2018)

आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेमसफरीवर जाणार आहात. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल. परंतु, इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका.

कन्या राशी भविष्य (Wednesday, December 12, 2018)

क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. खाजगी आणि गोपनीय माहीत अजिबात उघड करू नका. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस हा अत्यंत रोमँटिक असणार आहे.

तुल राशी भविष्य (Wednesday, December 12, 2018)

मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आजच्या दिवशी तुमच्याबद्दल वाईट विचार करणारी व्यक्ती, कटू संबंध संपविण्याचा प्रयत्न करेल, अर्थात त्याला आपण प्रतिसाद कसा देता त्यावर अवलंबून आहे. प्रेम प्रकरण थोडेस कठीण असेल. आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्यासाठी सरसावेल. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल.

वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, December 12, 2018)

आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.

धनु राशी भविष्य (Wednesday, December 12, 2018)

आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. तुमच्या खाजगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एक सुंदरशी बाजू पाहायला मिळेल.

मकर राशी भविष्य (Wednesday, December 12, 2018)

येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हसित राहा, त्यातूनच तुम्हा आधिक ऊर्जा मिळेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो, तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते.

कुम्भ राशी भविष्य (Wednesday, December 12, 2018)

मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अतिखाणे दुस-या दिवशी त्रासदायक ठरू शकते. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पु-या करण्याची काळजी घेईल. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका, त्याऐवजी स्वत:हून नव्या संधींचा शोध घ्या. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टींग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पहात असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलिफ मिळणार आहे. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.

मीन राशी भविष्य (Wednesday, December 12, 2018)

अलिकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व अध्यात्मिक फायदा होईल. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. अभ्यासाच्यावेळी देखील बाहेरील उपक्रमांत भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळाइतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. ब-याच काळापासून ते वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणा-या लोकांना तुम्ही वचन द्यााल. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील.

Show More

Related Articles

Back to top button
Close