Connect with us

शुक्रवार 11 जानेवारी : माता लक्ष्मी आज 5 राशीवर होणार प्रसन्न, होणार आर्थिक लाभ

Today's Horoscope

शुक्रवार 11 जानेवारी : माता लक्ष्मी आज 5 राशीवर होणार प्रसन्न, होणार आर्थिक लाभ

आज शुक्रवार 11 जानेवारी चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Friday, January 11, 2019)

तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील – परंतु केवळ गप्पा करणाºया लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमच्या कामाला आज दाद मिळेल.

वृषभ राशी भविष्य (Friday, January 11, 2019)

जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन स्पष्ट आणि चोख असू द्या. उत्तम मानवी मूल्ये जोपासा. मार्गदर्शन करण्याच्या सहज भावनेतून सर्वांना मदत करा. त्यातूनच तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आपोआप मधुर संबंध प्रस्थापित होतील. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

मिथुन राशी भविष्य (Friday, January 11, 2019)

आजच्या दिवशी चार भिंतीबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. मुलांकडून एखादी जबरदस्त बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरुप येईल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता.

कर्क राशी भविष्य (Friday, January 11, 2019)

अपेक्षित मातांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शक्य झाल्यास धुम्रपान करणा-या आपल्या मित्रासोबत थांबणे टाळा, तुमच्या होणा-या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करुन त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. तुमच्या प्रियकर/प्रेयसीने केलेल्या शेरेबाजीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल – तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणे टाळा. महत्त्वाच्या कामाची फाईल सर्व बाबतीत चोख आणि परिपूर्ण असल्याची तुम्हाला खात्री असल्याशिवाय वरिष्ठांच्या हाती सोपवू नका. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल, आणि तो/ती याबाबतचा रोष संध्याकाळी बोलून दाखवेल.

सिंह राशी भविष्य (Friday, January 11, 2019)

चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस रहा आणि निर्भयपणे वावरा. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल.

कन्या राशी भविष्य (Friday, January 11, 2019)

आज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. आपल्या महत्वाकांक्षा ज्येष्ठांना सांगा, ते तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.

तुल राशी भविष्य (Friday, January 11, 2019)

विजयोत्सव साजरा केल्याने तुम्हाला अतीव आनंद मिळेल. मित्रमंडळींसमवेत हा आनंद साजरा करा. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मैत्र लाभेल. आपल्या प्रियकर/प्रेयसीला न आवडणारे कपडे वापरू नका, त्यामुळे तो/ती नाराज होऊ शकते. आज तुम्ही सहजपणे समस्यांवर मात कराल आणि विजेते ठराल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल.

वृश्चिक राशी भविष्य (Friday, January 11, 2019)

तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्याने दृढ करण्याचा दिवस. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.

धनु राशी भविष्य (Friday, January 11, 2019)

गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. आपल्या निर्णयात पालकांच्या मदतीची नितांत गरज असेल. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. प्रवासाच्या संधी शोधाल. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल आणि तुमच्या जोडीदाराला मिठीत घ्याल.

मकर राशी भविष्य (Friday, January 11, 2019)

बाहेरील कामकाज आज तुम्हाला दमवणूक करणारे आणि ताणतणावाचे असेल. हुशारीने गुंतवणूक करा. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनावर प्रणयराधन करण्याचे विचार घोळतील. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.

कुम्भ राशी भविष्य (Friday, January 11, 2019)

सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल.

मीन राशी भविष्य (Friday, January 11, 2019)

तुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपण जडवू शकतो. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. धाकटा भाऊ किंवा धाकटी बहीण तुमच्याकडे सल्ला मागतील. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका, भागीदार आपला फायदा घेतील. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Today's Horoscope

Trending

To Top