horoscope

शनिवार 11 ऑगस्ट : पहा आजच्या दिवशी कोणावर राहील हनुमानाची कृपा

आज शनिवार 11 ऑगस्ट चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Saturday, August 11, 2018)

अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड बडबड करुन वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही कीती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. आजच्या दिवशी काळजी करू नका, आपले दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. एका मिठीचे आरोग्यावर होमाणे चांगले परिणाम तुम्हाला माहीतच असतील. तुमच्या जोडीदार आज तुम्हाला या परिणामांची अनुभूती अनेकदा देणार आहे.

वृषभ राशी भविष्य (Saturday, August 11, 2018)

बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. जे आपली परिस्थिती समजू शकतात आणि गरज ओळखू शकतात अशा जवळच्या मित्राबरोबर बाहेर फिरायला जा. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुमची प्रिय व्यक्ती रोमॅण्टिक आनंद देईल. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या फवा पसरविण्याची शक्यता आहे. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला तळहातावरच्या फोडासारखं जपेल.

मिथुन राशी भविष्य (Saturday, August 11, 2018)

गरज नसलेले कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. स्वत:ची प्रशंसा करण्यात वेळ घालवू नका, त्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करा आणि आयुष्याचे मर्म समजून घ्या. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी चढेल. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. आज तुम्ही एकमेकांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना समजून घ्याल.

कर्क राशी भविष्य (Saturday, August 11, 2018)

आज तुमची प्रकृती फारशी बरी नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करणे जड जाईल. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील – आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल.

सिंह राशी भविष्य (Saturday, August 11, 2018)

स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाला शीघ्रकोपी बनवतील आणि अविश्रांत काम करावे लागेल. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता.

कन्या राशी भविष्य (Saturday, August 11, 2018)

मुलांच्या सहवासात मनाचा दिलासा शोधा. कुटुंबातील मुलांची ही अनोखी उपचार पद्धती इतरांच्या मुलांमध्ये देखील आढळते. त्यातून आपणास मन:शांती तर मिळेलच, पण तुमच्या व्यग्रता शांत करेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियांसमवेत पार्टीसाठी जा. त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही तर आपली द्विधावस्था देखील नाहिशी होईल. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. तुमच्या दोघांमध्ये होणाऱ्या बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या नात्यावर दुष्परिणाम होईल.

तुल राशी भविष्य (Saturday, August 11, 2018)

आजच्या दिवशी चार भिंतीबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. अचानक उद्भवलेल्या अनपेक्षित खर्चामुळे तुमचा आर्थिक ताण वाढेल. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या म्हणजेच एखादा पदार्थ किंवा मिठी नाकारलीतर तर तो/ती दुखावेल.

वृश्चिक राशी भविष्य (Saturday, August 11, 2018)

आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आर्थिक अडचणींमुळे टीका आणि वादविवादाची परिस्थिती उद्भवेल. आपल्याकडून अतिअपेक्षा करणा-यांना नाही म्हणायची तयारी ठेवा. मित्रमंडळीसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल परंतु वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागेल. बाहेरगावी जाऊन पार्टी करणे, प्रणयराधन करायला मिळण्याची शक्यता असल्याने उत्साह निर्माण होईल परंतु त्यामुळे तुम्ही थकून जाल. तुम्ही अवचित काही चुकीचे बोलाल किंवा कृती कराल तर अधिकारी व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाहीत. आजच्या दिवशी तुमच्या संयमाची परीक्षा होणार आहे; त्यामुळे कामाच्या ठिकाणी आज तो घालवू नका.

धनु राशी भविष्य (Saturday, August 11, 2018)

तणावामुळे किंचित आजारी पडण्याची शक्यता आहे. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. कधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे? तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे.

मकर राशी भविष्य (Saturday, August 11, 2018)

अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर काहीतरी मस्तीखोर, उत्साही करण्यासाठी एकदम योग्य दिवस. आज तुम्ही प्रेम प्रदूषण पसरवाल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल.

कुम्भ राशी भविष्य (Saturday, August 11, 2018)

तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. कोणत्याही गोष्टींचा अंतिम निर्णय घेताना तुमच्या कुटूंबाचा त्याबाबत कौल घ्यावा. तुम्ही एकतर्फी निर्णय घेतलात तर तुम्ही अडचणीत सापडू शकाल. कुटुंबाला विश्वासात घेऊन संवाद साधून सर्वोत्तम निर्णय घेण्यात यशस्वी ठराल. तुमच्या प्रियकर/प्रेयसीने केलेल्या शेरेबाजीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल – तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणे टाळा. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. याचे कारण काहीही असू शकते, स्वयंपाक, स्वच्छता, इतर घरकाम इत्यादी.

मीन राशी भविष्य (Saturday, August 11, 2018)

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनादेखील तयार कराल. आपल्या प्रिय व्यक्तीचे तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असेल, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल.


Show More

Related Articles

Back to top button