horoscope

सोमवार 10 सप्टेंबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील आनंदी, तर 3 राशीसाठी त्रासदायक

आज सोमवार 10 सप्टेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Monday, September 10, 2018)

चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. वाईट सवयी तुम्हाला जडविण्यासाठी कारणीभूत ठरणा-या व्यक्तींपासून दूर राहा. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल..

वृषभ राशी भविष्य (Monday, September 10, 2018)

तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी दोन हात करू शकेल. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. आपल्या कुटुंबियांबद्दल कायम आपुलकीने वागा, त्यांच्यासोबत प्रेमाचे आनंदाचे चार क्षण व्यतीत करा. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाल शीघ्रकोपी बनवतील. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल.

मिथुन राशी भविष्य (Monday, September 10, 2018)

तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसºयांना सांगण्याने त्या सोडविण्यासाठी त्यांची मदत घेणे संयुक्तिक ठरते. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणा-या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. प्रेमप्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. व्यवसायातील आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे. दुस-या-तिस-या व्यक्तींकडून ऐकलेल्या बातम्या तपासून खात्री करून घ्या. . वीज खंडीत झाल्यामुळे किंवा इतर कोणत्यातरी कारणामुळे सकाळी तयार होण्यास उशीर होईल, पण तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या मदतीला येईल.

कर्क राशी भविष्य (Monday, September 10, 2018)

अवघडलेपण तुमची मानसिक शांतता बिघडवू शकते. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्याकीय मदतीची गरज भासेल. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मूडमधील बदल आज अनेक हेलकावे खाणारा असेल. सहका-यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला जाणून घ्यायची नव्हती, नेमकी तिच गोष्ट तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आज सांगण्याची शक्यता आहे.

सिंह राशी भविष्य (Monday, September 10, 2018)

तुमची चिंता, काळजी मिटविण्याची आत्यंतिक गरज असणारा काळ आहे. आपली शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतोच पण तुमच्या आयुष्यदेखील कमी होते हे आपणास लक्षात घ्यावे लागेल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. कधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे? तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे. अतिस्पष्टवक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घाला. आपल्या व्यावसायिक स्थानाला त्यामूळे अगदी सहजपणे धक्का बसू शकतो. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. डोळे सगळं सांगतात, आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आज डोळ्यात डोळे घालून संवाद साधणार आहात.

कन्या राशी भविष्य (Monday, September 10, 2018)

तुमच्या समस्यांमुळे तुमचा मानसिक आनंद आज दुरावेल. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. वयोवृद्ध नातेवाईक अवाजवी मागण्या करण्याची शक्यता आहे. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुमचा आनंदीपणा नष्ट करेल. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कणखर राहा.

तुल राशी भविष्य (Monday, September 10, 2018)

अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. पत्नीबरोबर सहलीला जाण्यासाठी दिवस खूपच चांगला आहे. तुमचा मूडही बदलेल आणि तुमच्या दोघांतील गैरसमज दूर होण्यासही त्याचा उपयोग होईल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केलीत तर सहकाºयांना राग येऊ शकतो – कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल.

वृश्चिक राशी भविष्य (Monday, September 10, 2018)

इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे, तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे आहे. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळित पार पडेल, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल.

धनु राशी भविष्य (Monday, September 10, 2018)

तुम्हाला ज्या पद्धतीने जे वाटते त्यावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाहीत. रोमान्ससाठी चांगला दिवस. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणावाचे मळभ असेल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील.

मकर राशी भविष्य (Monday, September 10, 2018)

तुमच्या चपळाईच्या कृतीने तुमचे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेले प्रश्न सुटतील. चैनीच्या वस्तु आणि करमणुकीसाठी अतिखर्च करू नका. जे तुमच्यावर प्रेम करतात, ज्यांना तुमची काळजी आहे अशा लोकांशी व्यवस्थित वागा. तुमचा/तुमची प्रियकर/प्रेयसी दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईझ आखा आणि आजचा दिवस तुमच्या आय़ुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. स्पर्श, चुंबने, मुके, मिठ्या या सर्वांचेच वैवाहिक आयुष्यात विशेष महत्त्व असते. त्या महत्त्वाचा आज तुम्हाला अनुभव येईल.

कुम्भ राशी भविष्य (Monday, September 10, 2018)

मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हा त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषत: सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांती अत्यंत गरजेची आहे. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील – कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. प्रत्येकाच्याच गरजा पुºया करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर अनेक दिशांमध्ये अनेक बाजूंनी तुम्ही ओढाताण होईल. खोटे बोलू नका, त्यामुळे आपले प्रेमप्रकरण संपुष्टात येऊ शकते. तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमचा/तुमची जोडीदार आज आजारी पडण्याची शक्यता आहे.. त्यामुळे काळजी घ्या.

मीन राशी भविष्य (Monday, September 10, 2018)

तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. प्रणय करायला मिळण्याची शक्यता आहे परंतु कामुक भावना उद्दिपित झाल्याने जोडिदाराशी संबंध बिघडतील. आजच्या दिवशी तुमच्या क्षमता आणि कमतरता दिसून येतील. आजचा दिवस काहीसा कठीण असणार आहे. आजच्या दिवशी घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोधळून आणि थकून जाल. तुमच्या दोघांमध्ये होणाऱ्या बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या नात्यावर दुष्परिणाम होईल.


Show More

Related Articles

Back to top button