Connect with us

गुरुवार 10 जानेवारी : दत्त माउलींची कृपा 4 राशींवर होणार, सगळी संकटे दूर होणार

Today's Horoscope

गुरुवार 10 जानेवारी : दत्त माउलींची कृपा 4 राशींवर होणार, सगळी संकटे दूर होणार

आज गुरुवार 10 जानेवारी चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Thursday, January 10, 2019)

आपल्या आरोग्याची उगाच चिंता करु नका, त्यामुळे आपला आजार बिघडण्याची शक्यता आहे. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील. तुमच्यावर प्रेम करणाºया आणि तुमची काळजी वाटणाºया लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ घालवा. पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल.

वृषभ राशी भविष्य (Thursday, January 10, 2019)

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. आजच्या दिवस रोमँटीक असण्याचे संकेत प्रबळ आहेत. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

मिथुन राशी भविष्य (Thursday, January 10, 2019)

तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. क्वचित भेटीगाठी होणाºया लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन होईल. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वत:ला गुंतवा. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल.

कर्क राशी भविष्य (Thursday, January 10, 2019)

अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. कौटुंबिक आणि महत्त्वाचे कार्यक्रम समारंभ पार पाडण्यासाठी शुभ दिवस. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे.

सिंह राशी भविष्य (Thursday, January 10, 2019)

अनेक चिंतांनी ग्रासल्यमुळे तुमची प्रतिकारक्षमता घटेल आणि विचारशक्ती कुंठेल. सकारात्मक विचारसरणी बाळगून या आजाराशी सामना करण्यासाठी स्वत:ला उत्तेजन द्या. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणा-या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज तोडी मोकळीक हवी असेल.

कन्या राशी भविष्य (Thursday, January 10, 2019)

आज घरी बसून आराम करण्याची गरज आहे – आणि आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. आपल्या प्रियसी/प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल करु नका. कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका, भागीदार आपला फायदा घेतील. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुम्ही आयुष्यात अाल्याने तुमचा/तुमची जोडीदार स्वत:ला नशीबवान समजते आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या.

तुल राशी भविष्य (Thursday, January 10, 2019)

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. दुस-यांना मदत करण्याची तुमची ताकद, सकारात्मक विचारांनी सुधारा. आपले संभाषणातील अनेक सुचना आपल्या कुटुंबियांना लाभदायक ठरतील. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजुबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. तुमच्या योजना आहे तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. जेव्हा तुमचा/तुमची जोडीदार विस्मयकारक असते/असतो तेव्हा आयुष्य मोहक असते, तुम्ही आज हाच अनुभव घेणार आहात.

वृश्चिक राशी भविष्य (Thursday, January 10, 2019)

तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाल शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. तुमच्या रोमॅण्टिक जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला छळाल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलेत तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल.

धनु राशी भविष्य (Thursday, January 10, 2019)

शाररीक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. अतिशय गरजेच्या वेळी चपळाईने कृती करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुमचे कौतुक होईल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.

मकर राशी भविष्य (Thursday, January 10, 2019)

तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. आपल्या प्रेमिकेशी अश्लील चाळे करू नका. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल.

कुम्भ राशी भविष्य (Thursday, January 10, 2019)

मानसिक ताणतणावर मात करण्यासाठी अध्यात्मिक, धार्मिक उपाययोजनांची सध्या तातडीची गरज आहे. ध्यानधारणा आणि योगसाधना तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवेल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्यासाठी सरसावेल. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.

मीन राशी भविष्य (Thursday, January 10, 2019)

कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Today's Horoscope

Trending

To Top