horoscope

रविवार 10 फेब्रुवारी : आज वसंत पंचमी या 7 राशींवर होणार माता सरस्वतीची कृपा होणार, होईल भरपूर प्रगती

आज रविवार 10 फेब्रुवारी चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Sunday, February 10, 2019)

इतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहितके ठरविताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. क्वचित भेटीगाठी होणाºया लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल.

वृषभ राशी भविष्य (Sunday, February 10, 2019)

तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. पवित्र आणि ख-या प्रेमाचा अनुभव येईल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा तु****** तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल.

मिथुन राशी भविष्य (Sunday, February 10, 2019)

तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल. कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली अध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. तुमचे तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. दुसºयांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल, तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल.

कर्क राशी भविष्य (Sunday, February 10, 2019)

चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी खास खरेदी करेल.

सिंह राशी भविष्य (Sunday, February 10, 2019)

काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल. पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता, अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवा. या कठीण प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हास मदत करतील. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुम्ही सगळ्या समस्या, अडचणी विसरून कुटुंबातील सदस्यांसमवेथ आनंदात वेळ घालवाल. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार आज शृंगार करताना दुखावले जाल. तेव्हा हळुवारपणा बाळगा.

कन्या राशी भविष्य (Sunday, February 10, 2019)

तुमच्या जोडीदाराचे धाडस आणि निष्ठेमुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल. परंतु, इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका.

तुल राशी भविष्य (Sunday, February 10, 2019)

तुम्हाला ज्या पद्धतीने जे वाटते त्यावर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. मित्रमंडळीसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल परंतु वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागेल. प्रणयराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल – म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवाल. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा.

वृश्चिक राशी भविष्य (Sunday, February 10, 2019)

प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. आज तुम्हाला एक असा अनुभव मिळणार आहे, ज्याने तुम्ही आयुष्यातील दु:ख विसरून जाल.

धनु राशी भविष्य (Sunday, February 10, 2019)

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. मतभेदांमुळे खाजगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आजा जाणूनबुजून दुखावेल, ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल.

मकर राशी भविष्य (Sunday, February 10, 2019)

आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, उदा. तो/ती तुमचा वाढदिवस विसरणे इत्यादी. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल.

कुम्भ राशी भविष्य (Sunday, February 10, 2019)

आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे कारण तुम्ही सदासर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. विवाह हे एक वरदान आहे, आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे.

मीन राशी भविष्य (Sunday, February 10, 2019)

कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडतेय असे नाही तर तुमची इच्छाशक्ती कमी पडतेय. तुमची ख-या क्षमता काय आहेत ते ओळखा. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. संध्याकाळ उजाडताच प्रियाराधन करण्याकडे तुमचा कल वाढेल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

Tags
Show More

Related Articles

Back to top button