Connect with us

शनिवार 1 सप्टेंबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी चांगला, तर 3 राशीसाठी समस्या देणारा

Today's Horoscope

शनिवार 1 सप्टेंबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी चांगला, तर 3 राशीसाठी समस्या देणारा

आज शनिवार 1 सप्टेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Saturday, September 01, 2018)

आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला हॉस्पिटल गाठावे लागू शकते. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनादेखील तयार कराल. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो, तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते.

वृषभ राशी भविष्य (Saturday, September 01, 2018)

मित्राच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते, पण चित्त शांत ठेवा. त्यामुळे उध्वस्त न होता आपत्ती टाळून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही -इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाºया समस्या सोडवू शकाल. प्रणयराधन करणे आज जमणार नाही. प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठेना कोठे तरी सुरुवात कराविच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. तुमचे वैवाहिक आयुष्य एका कठीण टप्प्यातून जात असल्याचा अनुभव येऊ शकतो.

मिथुन राशी भविष्य (Saturday, September 01, 2018)

तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. आज तुमचया अवतीभवतीच्या लोकांच्या विचित्र वागणुकीमुळे तुम्ही वैतागून जाल. एकतर्फी प्रेम तुम्हाला निराश करेल. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा – परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. तुम्ही पूर्ण क्षमतेने काम करत नसल्यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्याशी प्रमाणापेक्षा अधिक सक्तीने वागत आहेत, असे तुम्हाला वाटेल.

कर्क राशी भविष्य (Saturday, September 01, 2018)

पत्नी तुम्हाला आनंदी करील. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. वैवाहिक आयुष्याकडून आवस्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दु:खी होण्याची शक्यता अधिक.

सिंह राशी भविष्य (Saturday, September 01, 2018)

तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामांबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. आजच्या दिवशी ज्या आर्थिक फायद्याची अपेक्षा होती, तो फायदा लवकर होणार नाही. तुम्हाला आज काही समस्या उद्भवतील – पण वास्तववादी राहा आणि मदत करणाºया लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मूडमधील बदल आज अनेक हेलकावे खाणारा असेल. खाजगी आणि गोपनीय माहीत कधीही उघड करू नका. तुम्ही काहीतरी घोडचूक करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य दुखावले जाण्याची शक्यता आहे.

कन्या राशी भविष्य (Saturday, September 01, 2018)

तुम्हाला शांत ठेवणा-या उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवा. ग्रुपमध्ये सामील होणे दिलचस्प असेल, पण खर्चिकदेखील ठरेल, विशेषत: तुम्ही जर दुस-यांवर खर्च करणे थांबवले नाही तर. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिके/का ला दुखवू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. तुम्ही अवचित काही चुकीचे बोलाल किंवा कृती कराल तर अधिकारी व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाहीत. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. थोडीशी एक्साइटमेंट शोधा.

तुल राशी भविष्य (Saturday, September 01, 2018)

आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. कौटुंबिक जबाबदा-या बंधनांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. तुमच्या अतिशय व्यस्त कामकाजाच्या वेळेमुळे प्रणयराधनेस वेळ मिळणार नाही. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील मजा निघून गेली आहे, असे तुम्हाला वाटेल, पण लवकरच सगळं काही ठीक होईल.

वृश्चिक राशी भविष्य (Saturday, September 01, 2018)

तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा – मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. अनोख्या रोमान्सचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही स्वत:ची परीक्षा पाहाल – तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील – कोडी सोडवतील आणि अन्य काहीजण कथा-कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे.

धनु राशी भविष्य (Saturday, September 01, 2018)

तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनेल. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत.

मकर राशी भविष्य (Saturday, September 01, 2018)

अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील – परंतु केवळ गप्पा करणाºया लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या व्यवहारात वास्तववादी राहण्याचा प्रयत्न करा. खाजगी आणि गोपनीय माहीत कधीही उघड करू नका. तुमच्या जोडीदाराशी भांडण झाल्यावर आपले डोके भिंतीवर आपटावे असे तुम्हाला वाटू शकेल. तुम्ही ध्यान लावू शकलात तर खूपच चांगले राहील.

कुम्भ राशी भविष्य (Saturday, September 01, 2018)

क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होती परंतु त्याचा मन:शांतीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल.

मीन राशी भविष्य (Saturday, September 01, 2018)

तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. चैनीच्या वस्तु आणि करमणुकीसाठी अतिखर्च करू नका. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top