horoscope

रविवार 9 सप्टेंबर : आज या 3 राशीवर राहील परमेश्वर कृपा, तर 4 राशीसाठी त्रासदायक दिवस

आज रविवार 9 सप्टेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Sunday, September 09, 2018)

आज तुम्हाला खूप थकल्यासारखे जाणवेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्ही खूप वैतागण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. आपल्या पत्नीच्या सफलतेचे कौतुक करा, तिच्या यशाने आनंदी व्हा आणि उज्ज्वल भविष्याची कामना करा. कृतज्ञतेने आणि मनापासून तिच्या कामाचे कौतुक करा. प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे. आजुबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणूकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाईल.

वृषभ राशी भविष्य (Sunday, September 09, 2018)

अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. आज तुमचया अवतीभवतीच्या लोकांच्या विचित्र वागणुकीमुळे तुम्ही वैतागून जाल. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमचा/तुमची जोडीदार सॅकेरिनपेक्षाही गोड आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

मिथुन राशी भविष्य (Sunday, September 09, 2018)

आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनादेखील तयार कराल. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. तुम्ही प्रेमात पडला आहात, याचं हे लक्षण आहे! अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो, तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते.

कर्क राशी भविष्य (Sunday, September 09, 2018)

इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. – तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाºया गोष्टी करा. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. कुटुंब-मुले आणि मित्रमंडळी यांच्यासमवेत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. आपल्या प्रिय व्यक्तीचे अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.

सिंह राशी भविष्य (Sunday, September 09, 2018)

घरात काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. घरगुती वस्तुंची बेफिकीरपणे हाताळणी करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. इतरांना दुखावून नका आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. प्रणयराधन करणे आज जमणार नाही. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असता तेव्हा वाद होणे साहजिक आहे. तुमचे तुमच्या जोडीदाराशी कदाचित भांडण होईल.

कन्या राशी भविष्य (Sunday, September 09, 2018)

आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. आपण जर योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक केली असेल तर नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका, त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्ना करा. भेटवस्तूचा उपयोग केल्यानेदेखील आपल्या प्रिय व्यक्तीचा मूड बदलू शकत नाही. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आज खडतर काळ असू शकतो.

तुल राशी भविष्य (Sunday, September 09, 2018)

मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. अनावश्यक वादावादीमुळे कुटुंबात तणाव निर्माण होईल. वादावादीत जिंकलात म्हणजे विजय ख-या अर्थाने मिळाला असे नव्हे. शक्य असेल तर तर्कसुसंगत विचार करून वादावादी टाळा. तुमच्या ज्येष्ठांचे ऐका आणि तुमच्या समस्या सोडविण्यासाठी शांतपणे विचार करा. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. डोळे सगळं सांगतात, आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आज डोळ्यात डोळे घालून संवाद साधणार आहात.

वृश्चिक राशी भविष्य (Sunday, September 09, 2018)

तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. दैनंदिन व्यस्ततेतून थोडा वेळ काढी आणि मित्रमंडळींसमवेत आज बाहेर जा. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. आज दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका.

धनु राशी भविष्य (Sunday, September 09, 2018)

भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल – पुढे काय करायचे हे ठरविणे अवघड होऊन बसेल – इतरांची मदत घ्या. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. प्रणयराधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.

मकर राशी भविष्य (Sunday, September 09, 2018)

क्रॉसिंगवर काळजीपूर्वक वाहन चालवा. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. मुलांसोबत तुम्हाला आज खूप कठोर वागावे लागेल. तुम्हाला प्रियाराधन करण्याचा खूप वाईट अनुभव आल्याने तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी किती भांडण केले तरी तुमचे एकमेकांवर प्रेम आहे हे विसरू नका.

कुम्भ राशी भविष्य (Sunday, September 09, 2018)

सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणयराधन कराल. अनपेक्षित प्रवास घडतील. त्यामुळे तणाव आणि धावपळ होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे.

मीन राशी भविष्य (Sunday, September 09, 2018)

तुमच्या आजाराबद्दल चर्चा करणे टाळा. तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार, म्हणून इतर दुस-या कामामध्ये स्वत:ला गुंतविणे श्रेयस्कर. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमचा/तुमची आज खूप चांगल्या मूडमध्ये आहे. तुम्हाला आज सरप्राइझ मिळेल.


Show More

Related Articles

Back to top button