horoscope

बुधवार 10 ऑक्टोबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील शुभ तर 3 राशीसाठी कष्टदायक

आज बुधवार 10 ऑक्टोबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Wednesday, October 10, 2018)

इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहीती तुम्ही उघड करु नका. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, त्यांच्या कारकीर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील प्रियाराधन, पाठलाग, लाडीगोडी या सगळ्याच्या आठवणी जागवून तुम्ही ताजेतवाने व्हाल.

वृषभ राशी भविष्य (Wednesday, October 10, 2018)

तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन जर करमणुकीच्या कार्यक्रमास गेलात तर तो सर्वांसाठी आनंदी क्षण असेल. प्रणयराधन करण्याच्या आठवणींनी तुमचा दिवस व्यापून राहील. व्यवसायातील आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल.

मिथुन राशी भविष्य (Wednesday, October 10, 2018)

तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. मुलं खेळावर आणि इतर आऊटडोअर उपक्रमांवर अधिक वेळ घालवतील. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल.

कर्क राशी भविष्य (Wednesday, October 10, 2018)

कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेऊ, पण रोल मॉडेल म्हणून कोणीतरी तुमच्याकडे पाहत असते. त्यामुळेच केवळ प्रशंसनीय अशीच तुमची कृती ठेवा, त्यातूनच तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. अतिशय क्षुल्लक कारणांवरून शय्यासोबत करणा-या प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध तणावाचे बनतील. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील.

सिंह राशी भविष्य (Wednesday, October 10, 2018)

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. चढउतारांमुळे फायदा होईल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. ब-याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. आपलं काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रीत करा. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.

कन्या राशी भविष्य (Wednesday, October 10, 2018)

भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. कोणत्याही गोष्टींचा अंतिम निर्णय घेताना तुमच्या कुटूंबाचा त्याबाबत कौल घ्यावा. तुम्ही एकतर्फी निर्णय घेतलात तर तुम्ही अडचणीत सापडू शकाल. कुटुंबाला विश्वासात घेऊन संवाद साधून सर्वोत्तम निर्णय घेण्यात यशस्वी ठराल. प्रणय करायला मिळण्याची शक्यता आहे परंतु कामुक भावना उद्दिपित झाल्याने जोडिदाराशी संबंध बिघडतील. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे – म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा/तुमची जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल.

तुल राशी भविष्य (Wednesday, October 10, 2018)

आज शांत राहा-तणावमुक्त राहाल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारत तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी घ्या. मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे/भागादाराकडे दुर्लक्ष केले तर तो किंवा ती नाराज होतील. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.

वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, October 10, 2018)

पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. जे आपली परिस्थिती समजू शकतात आणि गरज ओळखू शकतात अशा जवळच्या मित्राबरोबर बाहेर फिरायला जा. जोडीदारासोबत प्रणय आराधना करण्यास गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमच्या कुटुंबीयांसमवेत तुमचे वाद होतील, पण िदवसाच्या शेवटी तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला प्रेमाने कुरवाळेल.

धनु राशी भविष्य (Wednesday, October 10, 2018)

तेलकट आणि तिखट आहार टाळा. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केलीत तर सहकाºयांना राग येऊ शकतो – कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब तुमच्या दीर्घकाळपर्यंतच्या नात्यासाठी चांगली ठरणार नाही.

मकर राशी भविष्य (Wednesday, October 10, 2018)

तणावाकडे दुर्लक्ष करू नका. तंबाखूसेवन आणि मद्यसेवनासारखेच तणाव हाही संसर्गजन्य विकार आहे. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. कर्मकांडे अथवा शुभकार्याचे सोहळे घरीच केलेले चांगले ठरतील. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल.

कुम्भ राशी भविष्य (Wednesday, October 10, 2018)

तुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या त-हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत – तर तुम्ही फायद्यात राहाल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते.

मीन राशी भविष्य (Wednesday, October 10, 2018)

आपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील – कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे आणि जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवा. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही, आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. आजच्याएवढं तुमचं वैवाहिक आयुष्य कधीच रंगीबेरंगी नव्हतं.


Show More

Related Articles

Back to top button