Today's Horoscope

गुरुवार 08 नोव्हेंबर : आज या 4 राशींना होणार धनलाभ, तर 3 राशींना होईल समस्या

आज गुरुवार 08 नोव्हेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Thursday, November 08, 2018)

जीवन आनंदाने जगण्याची आपल्या अपेक्षा आकांक्षा तपासून पाहा. योगसाधनेची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. आनंददायक सांयकाळ घालविण्यासाठी मित्राच्या घरी आमंत्रण येऊ शकते. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की, तुमचा/तुमची तुमच्यासाठीच तयारी करत होता/होती.

वृषभ राशी भविष्य (Thursday, November 08, 2018)

सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. हुशारीने गुंतवणूक करा. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिके/का ला दुखवू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुस-यांच्या दडपणाखाली वावरू नका. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचा/जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल.

मिथुन राशी भविष्य (Thursday, November 08, 2018)

भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळिक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. सहका-यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमच्या जोडीदाराला एखादी बाबा न सांगितल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल.

कर्क राशी भविष्य (Thursday, November 08, 2018)

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ वाया दवडला जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. काही काळ आपण केवळ स्वत:च्या जिवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असेल, सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असे दिसत नाही. प्रवासाच्या संधी शोधाल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल.

सिंह राशी भविष्य (Thursday, November 08, 2018)

पत्नी तुम्हाला आनंदी करील. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, तसेच इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल.

कन्या राशी भविष्य (Thursday, November 08, 2018)

अंगदुखीची दाट शक्यता आहे. शारिरीक ताण घेऊन काम करणे टाळा. कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही भागीदारांच्या/जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर तो/ती असहनशील बनतील. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलेत तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमचा/ तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.

तुल राशी भविष्य (Thursday, November 08, 2018)

आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडण आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागविणे थांबवेल, त्यामुळे दिवसभर निराश असाल.

वृश्चिक राशी भविष्य (Thursday, November 08, 2018)

तुम्हाला नुकताच नैराश्याचा झटका आला असेल तर योग्य पावले उचलली आणि आजच्या विचारांना प्राधान्य दिलेत तरी बरेच समाधान आणि आराम लाभेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. धुम्रपान सोडण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रोत्साहन देईल. अन्य वाईट सवयी सोडण्यासाठीसुद्धा हीच योग्य वेळ आहे. हातोडा गरम असतो तेव्हाच वार करावा, हे लक्षात ठेवा. अनोखा नवा रोमान्स तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हसित करणारा असेल. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

धनु राशी भविष्य (Thursday, November 08, 2018)

घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणेच इष्ट ठरेल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय, याची जाणीव आज तुम्हाला होईल.

मकर राशी भविष्य (Thursday, November 08, 2018)

प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलंत तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. तुमचे सहकर्मचारी यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही – परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत – तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल – तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पाहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात.

कुम्भ राशी भविष्य (Thursday, November 08, 2018)

ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. कर्मकांडे घरच्या घरीच करणे हिताचे ठरेल. प्रेमी युगुलांनी आपल्या कुटुंबांच्या भावनाचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरु नका. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.

मीन राशी भविष्य (Thursday, November 08, 2018)

आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. शेजा-याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. प्रेमामध्ये जोरजबरदस्ती टाळा. सुयोग्य कर्मचा-यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल.

Show More

Related Articles

Back to top button
Close