horoscope

बुधवार 07 नोव्हेंबर : आज या 7 राशींवर माता लक्ष्मी होणार प्रसन्न

 

आज बुधवार 07 नोव्हेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Wednesday, November 07, 2018)

अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. आपल्या निर्णयात पालकांच्या मदतीची नितांत गरज असेल. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. कामातील अवघड टप्पा सहका-यांच्या वेळीच झालेल्या मदतीमुळे पार पडेल. त्यामुळे तुमची व्यावसायिक बाजू सांभाळणे, व्यावसायिक स्थान पुन्हा मिळविणे शक्य होईल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुमच्या अवतीभवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका.

वृषभ राशी भविष्य (Wednesday, November 07, 2018)

आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. वैवाहिक आयुष्याचा विचार करता आज तुमचे जीव खूप सुंदर झाले आहे.

मिथुन राशी भविष्य (Wednesday, November 07, 2018)

तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. समूह कार्यात सहभागी झालात तर नवीन मित्र भेटतील. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज एक उत्तम संध्याकाळ व्यतित करणार आहात.

कर्क राशी भविष्य (Wednesday, November 07, 2018)

इतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहितके ठरविताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल – अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.

सिंह राशी भविष्य (Wednesday, November 07, 2018)

आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. तुमच्या योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील – म्हणून तुमच्या अवतीभवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल.

कन्या राशी भविष्य (Wednesday, November 07, 2018)

देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. तुमच्या अवतीभवती असलेल्या महत्त्वाचे निर्णय घेणाºया लोकांना तुमची मते सांगा त्याचा तुम्हाला फायदा होईल – तुमची कामातील हातोटी, प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यामुळे तुमचे कौतुक होईल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल.

तुल राशी भविष्य (Wednesday, November 07, 2018)

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील – तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल – निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. आज तुम्ही छोटी छोटी पण महत्त्वाची प्रलंबित कामे हातावेगळी करू शकाल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होईल परंतु त्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल. म्हणून अन्य लोक काय सांगतात किंवा सुचवितात यावर विश्वास ठेवाता काळजी घ्या.

वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, November 07, 2018)

तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. जवळच्या नातेवाईकांची, त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील, काळजी घेतील. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. प्रत्येकजण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे लक्षात ठेवा. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल.

धनु राशी भविष्य (Wednesday, November 07, 2018)

आरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या असाईनमेंटवर तुम्हाला जाता न आल्यामुळे तुम्हाला माघार घ्यावी लागेल, पण तुमचे तर्कशास्त्र वापरून पुढे जात राहा. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. मित्रमंडळींबरोबरील कार्यक्रम आनंददायी असतील, पण खर्च करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ नका, नाहीतर रिकाम्या खिशाने घरी जावे लागेल. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल.

मकर राशी भविष्य (Wednesday, November 07, 2018)

कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. आपल्यावर प्रेम करणा-या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.

कुम्भ राशी भविष्य (Wednesday, November 07, 2018)

मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. प्रेम आशेचा किरण दाखवेल. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळित पार पडेल, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल.

मीन राशी भविष्य (Wednesday, November 07, 2018)

शाररीक वेदना आणि ताणतणावाचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गूल व्हाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. वेळेला पैशाइतपतच असणारे महत्त्व तुम्ही जाणत असाल तर तुमच्या क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. आज तुम्ही एकमेकांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना समजून घ्याल.


Show More

Related Articles

Back to top button