horoscope

मंगळवार 07 ऑगस्ट : आजचा दिवस या 3 राशीसाठी राहील त्रासदायक तर या 4 राशीसाठी आनंदाचा

आज मंगळवार 07 ऑगस्ट चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Tuesday, August 07, 2018)

एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील ख-या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो/ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल.

वृषभ राशी भविष्य (Tuesday, August 07, 2018)

मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. नातेवाईकांना भेटून तुम्ही कल्पना केली असेल त्यापेक्षा बरे घडेल. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. आपल्या भागीदारांना गृहीत धरू नका. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या म्हणजेच एखादा पदार्थ किंवा मिठी नाकारलीतर तर तो/ती दुखावेल.

मिथुन राशी भविष्य (Tuesday, August 07, 2018)

मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरु शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ घालते. म्हणून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा गोष्टी आणखी अवघड होतात. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. तुमचे प्रेम असफल ठरेल. मार्केटिंग क्षेत्रात येण्याची आपली दीर्घकाळ असणारी महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे आपणास प्रचंड आनंद मिळेल आणि नोकरी मिळविण्यात आलेल्या सर्व अडचणी दूर होतील. अनपेक्षित प्रवास घडतील. त्यामुळे तणाव आणि धावपळ होईल. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल.

कर्क राशी भविष्य (Tuesday, August 07, 2018)

आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला हॉस्पिटल गाठावे लागू शकते. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. एका मित्र/मैत्रिणीच्या समस्येमुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यांची चिंता वाटेल. तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंदी करणे कठीण पडेल. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. तुमच्या जोडीदाराशी झालेल्या वादामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यातील बंध सैल झाले आहेत, असे तुम्हाला वाटू शकेल.

सिंह राशी भविष्य (Tuesday, August 07, 2018)

आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल मनाला रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमच्या जोडीदाराचे आंतरिक सौंदर्य आज बाहेर येईल.

कन्या राशी भविष्य (Tuesday, August 07, 2018)

तुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपण जडवू शकतो. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. दूरवरच्या नातेवाईकाकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. तुमचे अनियंत्रित चंचल वागणे यामुळे प्रिय व्यक्तीसोबत तुमचे मतभेद होतील. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. आजचा दिवस कठीण असणार आहे; पण संयम आणि शांतता राखली तर प्रत्येक अडथळा पार करता येऊ शकेल.

तुल राशी भविष्य (Tuesday, August 07, 2018)

तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. आज तुम्ही घरात आणि घराच्या अवतीभवती काही मोठे बदल करून घेण्याची शक्यता आहे. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाध आणू शकतात. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील.

वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, August 07, 2018)

निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील – लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे! प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.

धनु राशी भविष्य (Tuesday, August 07, 2018)

मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. जीवनसाथीचे आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुस-यांच्या दडपणाखाली वावरू नका. आपल्या वाटेत येणा-या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या बाहुपाशात गुरफटून जाण्यासाठी आज भरपूर वेळ मिळणार आहे.

मकर राशी भविष्य (Tuesday, August 07, 2018)

उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे. चैनीच्या वस्तु आणि करमणुकीसाठी अतिखर्च करू नका. मित्र आणि जवळचे स्नेही मदतीचा हात पुढे करतील. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. वेळेला पैशाइतपतच असणारे महत्त्व तुम्ही जाणत असाल तर तुमच्या क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुम्ही आज असं काहीतरी करणार आहात, ज्यानं तुमचा/तुमची जोडीदार खूप एक्साइट होणार आहे.

कुम्भ राशी भविष्य (Tuesday, August 07, 2018)

आपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपल्या नातेसंबंधाना धक्का बसू शकतो. खुल्या मनाने विचार करणे आणि कोणाही बद्दलचे पूर्वग्रह सोडून देण्याने आपल्या या स्वभावावर मात करू शकता. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका – तुम्ही प्रेम करीत असलेल्या व्यक्ती दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या प्रिय व्यक्तीमध्ये दोष शोधण्यात वेळ वाया घालवू नका. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी आज विचित्रप्रकारे वागण्याची शक्यता आहे. तुमचा संयम सोडू नका.

मीन राशी भविष्य (Tuesday, August 07, 2018)

आजच्या दिवशी तुमच्या चेह-यावरील निरंतर स्मित, नवख्या माणसामध्ये आपलेपणा निर्माण करेल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही -इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाºया समस्या सोडवू शकाल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव्र दु:ख देईल. आजचा दिवस कठीण असणार आहे; पण संयम आणि शांतता राखली तर प्रत्येक अडथळा पार करता येऊ शकेल. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुमच्या जोडीदाराच्या वागणूकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल.


Show More

Related Articles

Back to top button