horoscope

शनिवार 06 ऑक्टोबर : जाणून घ्या कसा राहील शनिवारचा दिवस

आज शनिवार 06 ऑक्टोबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Saturday, October 06, 2018)

आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.

वृषभ राशी भविष्य (Saturday, October 06, 2018)

आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता.

मिथुन राशी भविष्य (Saturday, October 06, 2018)

भीती, चिंता तुमच्या सुखी समाधानी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो, जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमता अपंग होते. म्हणून चिंतेचा निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खुडून टाका. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टींग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पहात असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलिफ मिळणार आहे. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

कर्क राशी भविष्य (Saturday, October 06, 2018)

अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. क्वचित भेटीगाठी होणाºया लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल आणि तुमच्या जोडीदाराला मिठीत घ्याल.

सिंह राशी भविष्य (Saturday, October 06, 2018)

चार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. बंदिस्त किल्ल्याप्रमाणे स्वत:भोवती सुरक्षित चौकट आखून त्याचाच विचार करण्याची जीवनशैली तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी मारक आहे. तुम्हाला ही जीवनशैली चिंताग्रस्त आणि उदास बनवणारी असते. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. मुलं तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा करतील, अर्थात त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.

कन्या राशी भविष्य (Saturday, October 06, 2018)

योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. मुलांवर आपली मते लादण्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा आपणास काय सांगायचे ते त्यांना समजण्यास मदत होईल असे करा, ते आपली मते स्वीकारतील. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल.

तुल राशी भविष्य (Saturday, October 06, 2018)

भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावूकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.

वृश्चिक राशी भविष्य (Saturday, October 06, 2018)

तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील.

धनु राशी भविष्य (Saturday, October 06, 2018)

मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचा/तुमची त्याच्या/तिच्या कामात इतका व्यस्त होईल, की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल.

मकर राशी भविष्य (Saturday, October 06, 2018)

आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. वयोवृद्ध नातेवाईक अवाजवी मागण्या करण्याची शक्यता आहे. दरदिवशी कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल.

कुम्भ राशी भविष्य (Saturday, October 06, 2018)

आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. घरामध्ये तुमची मुलं तुमच्यासमोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील, कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पाहा. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो, तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते.

मीन राशी भविष्य (Saturday, October 06, 2018)

तुमचे मनमोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे! प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.

 


Show More

Related Articles

Back to top button