horoscope

गुरुवार 04 ऑक्टोबर : या 4 राशीवर होणार माता लक्ष्मीची कृपा, जाणून घ्या राशिभविष्य

आज गुरुवार 04 ऑक्टोबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Thursday, October 04, 2018)

इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. – तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाºया गोष्टी करा. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.

वृषभ राशी भविष्य (Thursday, October 04, 2018)

तुमच्या अवतीभवतीचे लोक खूप कामाचा अपेक्षा तुमच्याकडून करतील – परंतु जेवढे काम तुम्ही करू शकता तेवढ्याचेच वचन द्या – आणि फक्त अशा लोकांना खुष ठेवण्यासाठी कामाचा ताण घेऊन दमून जाण्याची गरज नाही. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुमची प्रिय व्यक्ती रोमॅण्टिक आनंद देईल. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. आपल्या वाटेत येणा-या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला तळहातावरच्या फोडासारखं जपेल.

मिथुन राशी भविष्य (Thursday, October 04, 2018)

दु:खी कष्टी आणि निराश होऊन खिन्न होऊ नका. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील – परंतु बोलताना सांभाळून बोला. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रीत करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपू जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.

कर्क राशी भविष्य (Thursday, October 04, 2018)

अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले, की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील – आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे. आज सकाळी तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट मिळेल, ज्याने तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल.

सिंह राशी भविष्य (Thursday, October 04, 2018)

धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाल मन:शांती मिळवून देतील. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनादेखील तयार कराल. तुम्ही साथसंगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही – तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही – तुमचे हृदय ठकठक करणार नाही. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तिऱ्हाईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल.

कन्या राशी भविष्य (Thursday, October 04, 2018)

आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती तुम्ही भंग कराल. त्यांच्या सल्ल्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञांचे पालन करा. ब-याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडविणे गरजेचे आहे. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. तुमचा/तुमची जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल.

तुल राशी भविष्य (Thursday, October 04, 2018)

अधिक कोलेस्टेरॉल असलेला आहार सेवन करणे टाळा. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल. व्यवसायातील आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. तुमचा/तुमची जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल.

वृश्चिक राशी भविष्य (Thursday, October 04, 2018)

उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका, त्याने आजारी पडायची शक्यता अधिक आहे. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. मित्रमंडळीसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल परंतु वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागेल. प्रेम आणि रोमान्स तुमचा मूड आनंदी राखतील. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते.

धनु राशी भविष्य (Thursday, October 04, 2018)

मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे – तुमच्या मनावर दबाव येईल. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत शृंगार करायला भरपूर वेळ मिळेल, पण प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मकर राशी भविष्य (Thursday, October 04, 2018)

तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. आजच्या दिवशी आपल्या कुंटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे ही तुमची प्राथमिकता असेल. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील ख-या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जावा यासाठी तुमची आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. वीज खंडीत झाल्यामुळे किंवा इतर कोणत्यातरी कारणामुळे सकाळी तयार होण्यास उशीर होईल, पण तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या मदतीला येईल.

कुम्भ राशी भविष्य (Thursday, October 04, 2018)

घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. भावनिक धोका पत्करणे लाभदायक ठरेल. तुमच्या प्रियकर/प्रेयसीने केलेल्या शेरेबाजीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल – तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणे टाळा. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा – परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. याचे कारण काहीही असू शकते, स्वयंपाक, स्वच्छता, इतर घरकाम इत्यादी.

मीन राशी भविष्य (Thursday, October 04, 2018)

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल – परंतु तुमच्या आजुबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका किंवा तुम्ही एकटे पडाल. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. तुमची मेहनत आणि चिकाटीने काम करण्याची जिद्द याचा फायदा होईल आणि त्यामुळे विश्वास आणि पाठिंबा मिळेल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमचा/तुमची तुमच्या प्रतिष्ठेला आज थोडासा धक्का पोहोचवेल.


Show More

Related Articles

Back to top button