Connect with us

रविवार 04 नोव्हेंबर : ग्रहांचे स्थान परिवर्तन झाल्याने या 2 राशींना करावा लागेल समस्यांचा सामना

Today's Horoscope

रविवार 04 नोव्हेंबर : ग्रहांचे स्थान परिवर्तन झाल्याने या 2 राशींना करावा लागेल समस्यांचा सामना

आज रविवार 04 नोव्हेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Sunday, November 04, 2018)

तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमच्या प्रेमसंबंधावर आज विपरीत परिणाम संभवतो. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल.

वृषभ राशी भविष्य (Sunday, November 04, 2018)

रक्तदाबाचा विकार असणा-यांनी खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल – परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल.

मिथुन राशी भविष्य (Sunday, November 04, 2018)

अति उत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. इतरांना दुखावून नका आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. शिशिर ऋतुतील पानगळी प्रमाणे आपले प्रेम जीवन असू शकेल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल, आणि तो/ती याबाबतचा रोष संध्याकाळी बोलून दाखवेल.

कर्क राशी भविष्य (Sunday, November 04, 2018)

चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल.

सिंह राशी भविष्य (Sunday, November 04, 2018)

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पण आरोग्यालाल गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. मुलं खेळावर आणि इतर आऊटडोअर उपक्रमांवर अधिक वेळ घालवतील. प्रेम प्रकरणामध्ये स्वत:हून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराला आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे.

कन्या राशी भविष्य (Sunday, November 04, 2018)

अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. वैयक्तीक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. तुमचे पालक तुमच्या जोडादीराला आज सुंदरशी बेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल.

तुल राशी भविष्य (Sunday, November 04, 2018)

उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. चढउतारांमुळे फायदा होईल. तुमच्या घरातील साफसफाई करण्याचे काम ताबडतोबीने केले पाहिजे. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.

वृश्चिक राशी भविष्य (Sunday, November 04, 2018)

आयुष्याकडे दुखी गंभीर चेह-याने पाहू नका. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होईल परंतु त्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल. म्हणून अन्य लोक काय सांगतात किंवा सुचवितात यावर विश्वास ठेवाता काळजी घ्या.

धनु राशी भविष्य (Sunday, November 04, 2018)

आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील – तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खासगी स्पेस आवश्यक आहे.

मकर राशी भविष्य (Sunday, November 04, 2018)

तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका – त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल.

कुम्भ राशी भविष्य (Sunday, November 04, 2018)

आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.

मीन राशी भविष्य (Sunday, November 04, 2018)

तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. तुमचे धैर्य पाहून तुम्ही प्रेर्म ंजकाल. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. क्षुल्लक वाद विसरू जेव्हा तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top