horoscope

सोमवार 03 डिसेंबर : आज भोलेनाथ या चार राशींचे स्वप्ने करणार पूर्ण, पहा आजचे राशिभविष्य

आज सोमवार 03 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Monday, December 03, 2018)

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला आराम मिळवून देईल. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे.

वृषभ राशी भविष्य (Monday, December 03, 2018)

नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल – म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका – थोडी विश्रांती घ्या आणि आजच्या भेटीगाठींच्या वेळा पुढे ढकला. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक रोमान्स मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल.

मिथुन राशी भविष्य (Monday, December 03, 2018)

मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल.

कर्क राशी भविष्य (Monday, December 03, 2018)

खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतात भंग पावेल. कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेऊ नका. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल. हाताखालचे सहकारी किंवा सहकर्मचारी खूपच सहाय्यकारी ठरतील. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही; तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा.

सिंह राशी भविष्य (Monday, December 03, 2018)

इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका, त्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षादेखील वाढलेल्या असतील. तुमच्या खिडकीत फुले ठेवून तुमच्या प्रिय व्यक्तीला दाखवा. अतिशय गरजेच्या वेळी चपळाईने कृती करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुमचे कौतुक होईल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा.

कन्या राशी भविष्य (Monday, December 03, 2018)

आपल्या वजनावर लक्ष ठेवा, अतिखाण्यात आनंद मानू नका. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तिऱ्हाईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल.

तुल राशी भविष्य (Monday, December 03, 2018)

तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणा-या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमचा/तुमची जोडीदार सॅकेरिनपेक्षाही गोड आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

वृश्चिक राशी भविष्य (Monday, December 03, 2018)

कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आजच्या दिवशी काळजी करू नका, आपले दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करु शकतात. तुमचे चुंबकसदृश सदा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे.

धनु राशी भविष्य (Monday, December 03, 2018)

आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. आजच्या दिवस रोमँटीक असण्याचे संकेत प्रबळ आहेत. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.

मकर राशी भविष्य (Monday, December 03, 2018)

तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करा. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करुन त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल.

कुम्भ राशी भविष्य (Monday, December 03, 2018)

कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील.

मीन राशी भविष्य (Monday, December 03, 2018)

खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निंरतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. तुम्हीही काहीही करू शकाल – तुम्ही प्रभावी स्थितीत असाल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल.

Show More

Related Articles

Back to top button
Close